दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ७
छत्रपती संभाजीनगर | गंगापूर लासूर मार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर, एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव रामदास भिकनदास वैष्णव असून, सुभाष चुंगडे असे गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दुचाकीची समोरासमोर धडक – गंगापूर लासुरमार्गावर गंगापूर शहराजवळील शासकीय विश्रामगृह समोर दोन भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. होंडा कंपनीची शाईन क्रमांक MH 20 EV 9481, हिरो कंपनीची स्प्लेंडर क्रमांक MH 20 FH 3394 या दोन भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे.
उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल – घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ याने स्थानिकांच्या मदतीने दोनही अपघातग्रस्तांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वरावर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवले आहे. गंगापूर लासुर मार्गावर वाहनांची वर्दळ – गंगापूर येथील आठवडी बाजार शनिवार रोजी असल्याने बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. यामुळे गंगापूर शहरात येणाऱ्या मार्गावर ही वाहनांची मोठी वर्दळ असते. गंगापूर शहराजवळील शासकीय विश्राम गृहासमोर हा अपघात घडला आहे.