शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक महत्वपूर्ण निर्णय

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ११     

 दिल्ली-मुंबई  | अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या शिंदे फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार हे कायम राहणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि.११) दिला आहे. गेल्या साडेदहा महिन्यापासून या निकालाकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दुपारी दोन वाजता याबाबत शिंदे सरकार पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार असल्याचा ऐतिहासिक फैसला सुप्रीम कोर्टाने दिला असल्याने राज्याच्या व देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निकाल असल्याने अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकारला वाचवता येऊ शक्य होतं, त्याबाबत आम्ही काहीतरी करू शकलो असतो असेही मत न्यायालयाने म्हटले आहे. अध्यक्षांचे अधिकार ७ जणांचे घटनापीठ ठरवणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्याक्षांकडेच असणार असल्याने याबाबत विधानसभा अध्यक्षांनी ठराविक काळात निर्णय घ्यावा असेही कोर्टाने म्हटले आहे. व्हीपचा अधिकार संसदीय पक्षाच्या नेत्याला नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केल्याने शिंदे सरकारला दणका बसला आहे. गोगावालेंची व्हीप म्हणून नियुक्ती हि बेकायदा असल्याचे कोर्ट म्हणाले. संख्याबळ असले तरी पक्षावर दावा हा योग्य नाही असेही कोर्टाने स्पष्ट करून शिंदे गटाला फटकारले आहे.

तसेच राज्यापालावरही ताशेरे ओढले असून राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय  अयोग्य असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. विरोधकांकडून राज्यपालांकडे अविश्वासाचायाकडेही ठराव नव्हता याकडेही कोर्टाने लक्ष वेधले आहे. ठाकरे सरकार अल्पमतात नाही याबाबत कुठलाही पुरावा नाही तसेच पक्षीय राजकारणात राज्यपालांनी पडू नये याकडेही कोर्टाने लक्ष वेधले आहे. शिवसेना कुणाची हा दावा कुणीच करू शकत नाही. राज्यपालांकडे शिंदे सरकार ला शपथ देण्यापलीकडे पर्याय उरला नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले. पक्ष चिन्ह ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच असल्याने निवडणूक आयोगाला चिन्ह देण्यापासून रोखता येणार नाही असे कोर्टाने मांडले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच नाही असा महत्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार हे कायम राहणार असल्याचे या ऐतिहासिक निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला असून  याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!