युवा महोत्सव’चा आज समारोप ; अभिनेत्री वर्षा उसगांवकर ; अभिनेते प्रवीण डाळींबकर यांची उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.७

 छत्रपती संभाजीनगर | गेल्या तीन दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या युवा महोत्सवाचा समारोप अष्टपैलू अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय सुवा महोत्सव ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होत आहे.

सहा रंगमंचावर ३६ कलाप्रकारांचे गेल्या तीन दिवसात यशस्वीपणे सादरीकरण झाले. आता युवा कलावंताचे डोळे बक्षीस वितरण समारंभाकडे लागले आहेत. नाटयशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थीनी व प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते शनिवारी दि.सात सकाळी ११ वाजता ’सुजनरंग’ या मुख्य रंगमंचावर होईल. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. यावेळी मराठवाडयाचे भूमीपूत्र तथा ’घर, बंदूक, बिर्यानी’ या चित्रपटातून नावारुपाला आलेले अभिनेते प्रवीण डाळींबकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. मंचावर प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, संचालक डॉ.मुस्तजिब खान यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्रा.संभाजी भोसले, डॉ.दासू वैद्य, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.संजय पाटील देवळाणकर डॉ.सोनाली क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती राहील. या सोहळयास प्रेक्षक, युवा कलावंतांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी केले आहे.

महोत्सवासाठी राबले शेकडो हाथ…
केंद्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या, प्राध्यापक, कर्मचारी, ’कमवा व शिका’ योजनेचे विद्यार्थी असे तीनशेहून अधिक जणांनी अविरत परिश्रम घेतले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य परिसरात ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होत आहे. जवळपास महिन्याभरापासून महोत्सवाची तयारी सुरु आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळाने २० समित्या स्थान केला. या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य मिळून जवळपास ३१० जण कार्यरत आहेत. यामध्ये व्यासपीठ, पाहुणे निवड, परीक्षक, वेळापत्रक, निवास व भोजन, प्रसिध्दी, निकाल, तक्रार निवारण, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, बक्षीस वितरण, टेंडर, सुरक्षा आदी समित्यांचा समावेश आहे. डॉ.संजय पाटील देवळानकर, डॉ.दासू वैद्य, प्रा.संभाजी भोसले, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.योगिता पाटील, दत्तात्रय भांगे, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.सोनाली क्षीरसागर, डॉ.संजय शिंदे, बाळू इंगळे आदी समित्यांचे अध्यक्ष आहेत. तर विद्यार्थी विकास विभागातील हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर, अनिल केदारे, बाळासाहेब जाधव आदीसह ’कमवा व शिका’ योजनेच्या ११० विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १० प्राध्यापकांचा यात समावेश आहे.

’युवा महोत्सवा’च्या पहिला निकाल जाहिर…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय ’युवा महोत्सवातील’ प्रश्न मंजुषा या गटातील पहिला निकाल जाहिर झाला आहे. या कलाप्रकारात ८३ महाविद्याल्यांच्या संघानी सहभाग घेतला. यामध्ये शिवाजी महाविद्यालय कन्नड प्रथम तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्यूत्तर विभाग द्वितीय ठरले तर देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. डॉ.कैलास अंभुरे, प्रा.पराग हासे, डॉ.सादिक बागवान, डॉ.विलास इप्पर, धम्मपाल जाधव आदींनी स्पर्धेचे संयोजन, परीक्षण केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!