स्वाभिमान क्रीडा मंडळाने रास दांडियातून पारंपारिक संस्कृती जोपासली ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचे प्रतिपादन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१९   

छत्रपती संभाजीनगर | आपले सण उत्सव ही येणाऱ्या नव्या पिढीला प्रोत्साहन आणि उर्जा देणारे आहेत. पारंपारिक संस्कृती स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन ३, रास दांडियातून जोपासली जात असल्याचे मत व्यक्त करत केंद्रीय अर्थ व वित्त नियोजन राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड व संपूर्ण सदस्यांचे बुधवारी (दि.१८) अभिनंदन केले. यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, माजी नगरसेवक बालाजी मुंढे, महेश माळवादकर, नगरसेविका माधुरी अदवंत, डॉ.प्रेरणा खैरे, आयोजक प्रमोद राठोड उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे, यांची उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचे उत्सव समिती अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमरसिंग ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी यांनी स्वगात केले. पुढे बोलतांना  डॉ.भागवत कराड म्हणाले कि, महाराष्ट्राच्या संस्कृतीतील पारंपारिक नवरात्र उत्सव आपण साजरा करत आहोत. हा उत्सव साजरा करण्यासाठी स्वाभिमान क्रीडा मंडळाने गेल्या १५  वर्षापासून सातत्य ठेवले. उत्कृष्ट नियोजन आणि महिलांची सुरक्षा तसेच इतर नियोजन लक्षवेधी आहे. मी सर्व स्वाभिमान क्रीडा मंडळाचे मनापासून अभिनंदन करतो. माझी पत्नी अंजली कराड या सातत्याने या ठिकाणी दांडिया खेळण्यासाठी दर वर्षी येतात. जेव्हा मी नगरसेवक हि नव्हतो तेव्हापासून त्यांना दांडिया खेळण्यासाठी सोडायला यायचो. आज देशाचा अर्थराज्य मंत्री असतांना मला वेळ काढता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हा सर्वांना चांगल्या दांडिया खेळण्याचे प्रशिक्षण मिळू शकते असे बोलताच दांडिया प्रेमींनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. डॉ.कराड यांनी यावेळी प्रमोद राठोड यांचे आभार मानले.

(छायाचित्र : नितीन शेजूळ, अल्बम हाऊस, छत्रपती संभाजी नगर)

गेली १३ वर्ष अखंडरित्या शहरातील देवीभक्त तसेच दांडियापटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन-३ रास दांडिया प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार लोकसहभागाने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शिवछत्रपती महाविद्यालया समोरील गरबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रास दांडियात महिला, तरुण, तरुणींचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो यासाठी चांगले नियोजन करून रास दांडिया नवरात्र उत्सव पारंपारिक आणि संस्कृती जोपासणारा साजरा करण्यास आमचे प्राधान्य आहे असे प्रमोद राठोड यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. संदीप काळे यांची अद्ययावत ध्वनी व्यवस्था तसेच मनोज बोरा यांच्या सिध्दी डेकोरेटर्स च्या वतीने करण्यात आलेली आकर्षक स्टेज व्यवस्था हे या रास दांडियाचे मुख्य वैशिष्ट असून ४ दिवस हा रास दांडिया उत्तरोत्तर रंगणार आहे.

(छायाचित्र : नितीन शेजूळ, अल्बम हाऊस, छत्रपती संभाजी नगर)

याप्रसंगी मुख्य व्यवस्थापक प्रदीप राठोड, उत्सव समितीचे अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमरसिंग ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी, जीवन रौंदळ, पंकज परदेशी, रऊफ पठाण, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, यांची उपस्थिती होती.  सिद्धी डेकोरेटर्स चे मनोज मामाजी बोरा, संदीप साऊंड चे संदीप काळे, छायाचित्रकार नितीन शेजूळ, यांची उपस्थिती होती.  गायिका डॉ.प्रिया नरवडे, गायक कुणाल वराळे आणि गायक संदीप चाबुकस्वार यांच्या बहारदार स्वरांवर पहिल्याच दिवशी गर्दी करत दांडिया प्रेमी थिरकली. या रास दांडिया उत्सवात नियमित खेळणार्‍या दांडियापटूंंना, विशेष वेशभुषा, बेस्ट स्टॅमिना, बेस्ट परफॉर्मर, उत्कृष्ट दांडियापटू, बेस्ट कपल ची निवड परिक्षकांद्वारे करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या रास दांडियाचे बहारदार सूत्र संचालन प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे यांनी केले.

(छायाचित्र : नितीन शेजूळ, अल्बम हाऊस, छत्रपती संभाजी नगर)

नवरात्रउत्सवात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने महिला व मुलींची विशेष सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असून प्रवेशीकेद्वारेच दांडियापटूंंना या एन-3 रास दांडियात सहभागी होता येणार आहे. रास दांडिया खेळणार्‍या तसेच याठिकाणी भेट देणार्‍या प्रत्येकांसाठी खाद्य दालनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज असणाऱ्या या पारंपारिक रास दांडियात सहभागी होऊन रास दांडिया खेळण्याचे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने  करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!