पतंगबाजी मुळे नायलॉन मांजाने गळा कापल्या गेल्याने तरुण जखमी ; नायलॉन मांजाने पतंग उडवू नकाच!

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ७    

छत्रपती संभाजीनगर | सोशल माध्यमांवर वारंवार आवाहन करूनही शहरातील काही बहाद्दर नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान बेगमपुरा येथून विद्यापीठाकडे जातांना एका तरुणाचा गळा या नायलॉन मांजाने कापल्याने त्याला गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. चैतन्य शंकर मुंढे (वय १९ रा. बेगमपुरा) असे जखमी तरुणाचे नाव असून सात ते आठ इंच त्याचा गळा कापला गेला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

काय आहे घटना….

चैत्यन्य हा जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला. अचानक विद्यापीठ गेटजवळ त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला आणि यात त्याचा सात ते आठ इंच गळा कापला गेला. त्याने तात्काळ दुचाकी थांबवून पाहिले असता, पतंग उडवणारी मुलं तेथून निघून गेली. त्याने त्याच्या गळ्याला हात लावून पाहिला असता, त्याला जखम झाल्याचे दिसून आले. सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान त्याने तात्काळ ही बाब मामाला कळवल्यानंतर त्याचे मामा सुदर्शन लटपटे यांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्या भागात अनेक मुले पतंग उडवत होती. त्यापैकी एकाच्या मांज्याने माझा गळा कापला गेला. दुचाकीचा वेग कमी असल्याने मी थोडक्यात बचावलो. मी जखमी झाल्याचे पाहून पतंग उडवणारी मुले तेथून निघून गेली असे चैत्यन्य याने सांगितले.

आवाहन…

विविध उत्सव तसेच सणानिमित्ताने अनेकांना पतंग उडविण्याचा छंद आहे. मात्र पतंग बाजीत पतंग तुटल्यानंतर त्यासोबत असलेला मांजा हा झाडत, विद्युत तारांवर अडकतो. कधी कधी पतंग कटल्यावर त्यासोबत असलेला मांजा नॉयलॉन दोरा रहदारी असलेल्या रस्त्यावर लोंबकळत असतो. परिणामी वाहनधारक, पशु-पक्षी यामुळे गंभीररित्या जखमी होतात. कधी कधी मोठी दुर्घटनाही घडते. त्यामुळे प्रत्येकाने पतंग उडवताना आपली तसेच इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन लाईव्ह महाराष्ट्र 24×7 न्यूज टीम च्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!