राजमाता जिजाऊ प्रवेशद्वाराच्या विकासकामाचे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२५

छत्रपती संभाजीनगर | ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करताना येणाऱ्या प्रत्येकामध्ये ऊर्जा व प्रेरणादायी करणारे राजमाता जिजाऊमाता या ऐतिहासिक प्रवेशव्दाराचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते गेल्या महिन्यापूर्वी झालेल्या भूमिपूजन प्रवेशद्वाराचे  शनिवारी (ता.२५) शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पूजन करून विकासकामाची सुरुवात करण्यात आली.

सुंदरवाडी जवळील उड्डाण पुलालगत असलेल्या जिजाऊ चौकात हे भव्य दिव्य प्रवेशद्वार लवकरच साकारणार असून शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी लक्षवेधी ठरणार आहे. राजमाता जिजाऊ प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य असे की, वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आणि सिंदखेड राजा हे देखील शिवाजी महाराज यांचे आजोळ असून या दोन्ही शहराला जोडणारे हे प्रवेशद्वार ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरणार आहे.

या कामासाठी आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून नगरविकास खात्याच्या माध्यमातून राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ स्मारक छत्रपती संभाजी नगरात प्रवेशद्वार उभारणे व सुशोभीकरण करणे या कामाकरिता ५ कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला होता. तसेच या भूमिपूजन झालेल्या प्रवेशद्वार आर्किटेक यांच्यामाध्यमातून 3D असे डिझाईन करून या कामाला शानिवार्ज पासून सुरुवात करण्यात आली आहे.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख रमेश बाहुले, उपशहरप्रमुख राजू राजपूत,विकीराजे पाटील, राम मंदिर ट्रस्टचे मनसुटे काका, बापू शिरसाठ, ज्ञानेश्वर मोहिते किरण चिखले, विजयाताई पवार, उषाताई कदम, शुभ्र कदम, ऍड. सुवर्णाताई मोहिते ,नितीन देवतवाल , अनिल चव्हाण,अनंत भोसले ,भाऊसाहेब थोरात, शुभम बिल्लोरे, अरुण हिवाळे, प्रल्लाद भुसारे पा, मायकल शिंदे , रणजित निकम, सागर गायकवाड यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!