दादा कोंडके यांचा अभिनय म्हणजे कायम उर्जा देणारा ; सिने अभिनेते संदीप गायकवाड

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ४
छत्रपती संभाजीनगर | स्वर्गीय अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीत मोठे योगदान दिले आहे. मी स्वतः ला खूप भाग्यवान समजतो कि स्वर्गीय दादा कोंडके यांची व्यक्तिरेखा साकारून मला ते अभिनयातून मांडता येत आहेत. नव्या गीतामध्ये दादांची आठवण म्हणजे पाहणाऱ्या प्रत्येकाला उर्जा देणारी आहे. महाराष्ट्र चित्रपट महामंडळाने हि संधी मला दिली त्यामुळे मला स्वर्गीय दादा कोंडके यांची व्यक्तिरेखा माझ्यासह प्रत्येकाला उर्जा व प्रेरणा देणारी असल्याचे मत प्रसिद्ध मराठी विनोदी सिने अभिनेते संदीप गायकवाड यांनी बुधवारी (दि.४) आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. महाराष्ट्र चित्रपट महामंडळ व सुनहरा फिल्म्सची निर्मिती असलेल्या दादा कोंडके यांच्यावर आधारित नव्या मराठी गीताच्या निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपट महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत होर्शीळ, कार्याध्यक्ष डॉ.रविराज जाधव यांची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांची विदारक परिस्थिती मी स्वतः पाहिली आहे. त्यामुळे ज्या वेदना ते सहन करतात, त्यांच्या मुला-मुलींना ज्याही शिक्षणिक समस्या उद्भवतात त्या आगामी चित्रपटातून मांडणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिग्दर्शक प्रा.डॉ. प्रशांत होर्शीळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. कलावंताच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र चित्रपट महामंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या वतीने विविध उपक्रम या नव्या वर्षात राबविण्यात येणार असून या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलांमुलींच्या शैक्षणिक समस्या मांडणाऱ्या व महिलांच्या शोषण समस्येवर आधारित आगामी नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. लवकरच सिनेअभिनेते संदीप गायकवाड यांची भूमिका असलेल्या नव्या मराठी व्हिडीओ सॉंग ची निर्मिती करण्यात येणार असून त्याचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे.अशी माहिती दिग्दर्शक प्रा.डॉ.प्रशांत होर्शीळ यांनी दिली. महामंडळाच्या वतीने अनेक ऍल्बम सॉंग, वेब सिरीज, चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्यावर्षात मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कलावंतांना आगामी चित्रपट, व्हिडीओ सॉंग मध्ये संधी देण्यात येणार आहे. सिने अभिनेते संदीप गायकवाड यांनी विविध चित्रपट, मालिका तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन, झी युवा वरील लाव रे तो व्हिडीओ, या टीव्ही शो मध्ये आपली भूमिका केली आहे. स्वर्गीय मराठी अभिनेते दादा कोंडके यांची व्यक्तिरेखा त्यांनी साकारून जेष्ठ अभिनेते दादा कोंडके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. संदीप गायकवाड यांचा दादा कोंडके व्यक्तिरेखेतील अभिनय महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. सुनहरा फिल्म्स च्या वतीने निर्मिती करण्यात येणाऱ्या दादा कोंडके यांच्यावर आधारित नव्या व्हिडीओ सॉंग तसेच उसतोड कामगारांच्या मुलांवर आधारित सिनेमाचे दिग्दर्शन महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत होर्शीळ यांनी केले असून कथा लेखन प्रकाश भागवत यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन राहुल काकडे यांचे आहे. मराठवाड्यातील कलावंताचा सहभाग असलेल्या या चित्रपटासाठी अध्यक्ष आनंद प्रल्हाद शिंदे, कार्याध्यक्ष डॉ.रविराज जाधव, कोषाध्यक्ष विजयकुमार दाभाडे, डॉक्टर सेल चे अध्यक्ष अभिजित भागात, विकास कापरे, नृत्य दिग्दर्शक राहुल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे हे पुढाकार घेत आहेत. कलावंताना काम मिळावे यासाठी महाराष्ट्र चित्रपट महामंडळ काम करत आहे. मुंबई-पुणे येथे जाऊन महामंडळ कार्यशील असून टी सिरीज सोबत महामंडळाचे विविध प्रकल्प सुरु असल्याची माहिती यावेळी प्रा.डॉ. प्रशांत होर्शीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://www.youtube.com/@livemaharashtra24x7