भामला फाउंडेशनच्या वतीने एमजीम विद्यापीठात वृक्षारोपण ; संस्थापक अध्यक्ष आसिफ भामला, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हाध्यक्ष राहुल बोरोले यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संतुनासाठी उपक्रम ; भर पावसात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१०  

छत्रपती संभाजीनगर | पर्यावरणाचे संतुलन राखत वृक्षारोपणाबाबत तरुणाई मध्ये जनजागृती करण्यासाठी भामला फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राज्यभरात आयोजित करण्यात येतात याच उपक्रमांपैकी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सहकार्याने, एमजीएम युनिव्हर्सिटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जेएनईसी महाविद्यालयाच्या परिसरात भामला फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण शुक्रवारी (दि.८) करण्यात आले. भर पावसात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

याप्रसंगी भामला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भामला, मुख्य कार्यकारी अधिकारी मेराज हुसैन, महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकार, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, विभागप्रमुख डॉ. विनोद मोकळे, भामला फाउंडेशनचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष राहुल बोरोले यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भामला फाउंडेशनचे मोठे काम मुंबई शहरात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आहे या फाउंडेशन सोबत पर्यावरण संतुलनासाठी काम करत असल्याचं मोठं समाधान वाटते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या फाउंडेशन सोबत करत असल्याचा मोठा आनंद आहे. भविष्यात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही भामला फाउंडेशन सोबत कायम राहू असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त श्रीकांत यांनी दिले. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकार म्हणाले की शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण करणे खूप आवश्यक आहे आपल्या सभोवतालचा परिसर हिरवाईने नटलेला असावाच आणि यासाठी एमजीएम विद्यापीठ नेहमीच आपले योगदान देते. वृक्ष लागवडीच्या शाश्वत विकासासाठी तरुणाई मध्ये वृक्षारोपण बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे यामध्ये तरुणांचा अधिक सहभाग असल्यास आपले भविष्य प्रदूषण विरहित राहील असा विश्वास वाटतो भामला फाउंडेशन हा उपक्रम राबविल्याबद्दल भामला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भामला फाउंडेशन तसेच त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी मी शुभेच्छा देतो. या वृक्षारोपण अभियानासाठी बाळू गायकवाड, अविनाश पवार, मनोज लोखंडे पाटील, सौरव तोतरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, भास्कर निकाळजे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!