पॅंथर्स आर्मीच्या वतीने मुकुंदवाडीत महामानवाला अभिवादन

छत्रपती संभाजी नगर | भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वाण दिनी मुकुंदवाडी येथे पॅंथर्स आर्मीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी पँथर्स आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी लढणारी पँथर्स आर्मी आहे. आज महापरीनिर्वाणदिन म्हणजे संकल्प करण्याचा दिवस असून तो पूर्ण करण्यासाठी पँथर्स आर्मी कटिबद्ध आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारांना शिक्षण, संविधान जनजागृती यासही इतर विविध सामाजिक उपक्रम तसेच नव्या तरुण पिढीत रुजविण्यासाठी पँथर्स आर्मी निस्वार्थ भावनेने काम करत राहील. मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर गेल्या दोन वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पँथर्स आर्मीच्या अभिवादन कार्यक्रम घेण्यात येतो. छत्रपती आणि घटनापती यांचे विचार नव्या तरुण पिढीत रुजवणारी ही परंपरा अशीच पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे पँथर्स आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांनी सांगितले. आगामी काळात गरजू विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम पँथर्स आर्मीच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अभिवादन करताना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद गिरी, माजी नगरसेवक आर.बी. चव्हाण, लाईव्ह महाराष्ट्रचे पत्रकार सचिन अंभोरे, भास्कर निकाळजे, सुनील गडवे, सचिन मिसाळ, वरद जोगस, सुरज खाजेकर, अनिल गवळे, विधीज्ञ संघपाल इंगळे, अनिल साळवे, कामिनी हाडोळे, मुजीब शेख, सागर तुपे, दिनकर खरात, जगताप बाबा, भूषण नवगिरे, प्रशांत बनकर, सुधाकर इंगळे, अनिल त्रीगोटे व परिसरातील आंबेडकर अनुयाययांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.