महाविकास आघाडीच्या वतीने श्रीराम नगरात भव्य दिव्य “शिवजन्मोत्सव” ; शुक्रवारी “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” महानाट्य

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २२
छत्रपती संभाजी नगर | एन-२ सिडको, श्रीरामनगर, म्हाडा कॉलनी, संजय नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, प्रकाश नगर, विठ्ठल नगर, तोरणा गड नगर, मुर्तीजापुर परिसरातील महाविकास आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती सामाजिक संघटना व समविचारी पक्ष तसेच समस्त शिवप्रेमींच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवजयंतीचे मुख्य आकर्षण सारा प्रस्तुत, भगवान मेदनकर निर्मित, राजकुमार तांगडे लिखित व नंदू माधव दिग्दर्शित “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” हे असंख्य पारितोषिक विजेते भव्य दिव्य महानाट्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ५.३० वा. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा मैदान, प्रकाशनगर पूर्व,विठ्ठल नगर, श्रीरामनगर, सिडको एन -२, येथे करण्यात आल्याची माहिती महाविकास आघाडी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गंगाराम कापसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून रमेशअण्णा मुळे, विनोद पाटील, अभिजित देशमुख, डॉ.सचिन बेदमुथा, डॉ.महेंद्र खैरनार, प्राचार्य आनंद सूर्यवंशी, डॉ.राजेंद्र झोल, साईनाथ आहेर, शहजीज भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी महाविकास आघाडी शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष सुभाष पांडभरे पाटील, निमंत्रक माजी नगरसेवक गौतम लांडगे, राहुल सावंत, भास्कर लहाने, वल्लभ भंडारी, दीपक म्हस्के,दशरथ मानवतकर, सुभाष शुक्ला, विष्णू गंठाळ, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. या महानाट्यास शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.