वाद्य संस्कृती जोपासण्यासाठी ऐतिहासिक सोहळा शहरात आयोजित करणार ; मनपा आयुक्त जी श्रीकांत

मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची आरती ; महासंघाच्या वतीने आज उदय साटम निर्मित “मराठी पाऊल पडते पुढे” कार्यक्रमाचे आयोजन
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२३
छत्रपती संभाजीनगर | दि. २२: निराला बाजार, येथील मोतीवाला कॉम्प्लेक्स च्या केएफसी बिल्डींग मध्ये असलेल्या श्री गणेश महासंघाच्या “श्री” ची आरती बुधवारी (दि.२२) मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांची उपस्थिती होती. यावेळी
यावेळी गणरायाला साकडे घालताना मनपा आयुक्त जी.श्रीकांत म्हणाले की, देशातील सर्वात मोठी पाणी योजना आपल्या संभाजी नगर शहरात होत आहे. या पाणी योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षापर्यंत हे काम निर्विघ्नपने पाडावे यासाठी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. देशभरातील वाद्य संस्कृती जोपसली जावी यासाठी देशभरातील विविध राज्यातील वाद्यांचा एक मोठा सोहळा या ऐतिहासिक शहरात झाला पाहिजे यासाठी गणेश महासंघाने पुढाकार घ्यावा, त्याला महानगरपालिका सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. उत्सव समिती कार्याध्यक्ष हर्षवर्धन कराड, अभिषेक देशमुख, विशाल दाभाडे, सुमित खांबेकर, सदिंप शेळके, विजय चौधरी, विनोद साबळे, विजय निकाळजे, सागर कर्डक, मधुर चव्हाण, राहुल देवगिरीकर, अमोल पाठे, रोहित सोळसे , राजेंद्र जंगले , मंगेश डोंगरे, सुभाष कुमावत, अभिजित गंगावणे, प्रमोद अंबेवडिकर, दिनेश सुखदान, रोहित शिंदे, ईश्वर गौर, पप्पू धोंदे, यांची उपस्थिती होती.
महासंघाच्या वतीने आज उदय साटम निर्मित “मराठी पाऊल पडते पुढे” कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती च्या वतीने श्री गणेशोत्सव निमित्ताने पडेगाव येथे शनीवारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजता उदय साटम निर्मित “मराठी पाऊल पडते पुढे” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संस्कृती जोपासावी तसेच हिंदू संस्कृतीतील सण, उत्सव, परंपरा याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या अभिनव उपक्रमाचे व्यापक स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमास श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.