मनसे प्रमुख राज ठाकरे आज शहरात ; विवाह सोहळ्यास उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ११
छत्रपती संभाजी नगर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी (दि.११) छत्रपती संभाजी नगर मध्ये दाखल होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे येथील पदाधिकारी सातपुते यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील. विवाह सोहळ्यास यासाठी ठाकरे हे शनिवारी ४.३० वाजता विमानाने औरंगाबादेत येणार आहेत.
शहरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये हा विवाह सोहळा असून लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यानंतर ते शहरात हॉटेलमध्ये मुक्कामी राहतील आणि मुक्कामी राहून रविवारी सकाळी विमानाने मुंबईला रवाना होतील. असे मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.