बीड मतदार संघातील दहा ग्रामपंचायतीवर माजी मंत्री क्षीरसागर यांचे वर्चस्व

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६
बीड | मतदार संघातील एकूण १७ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने चांगलीच सरशी मारली आहे बीड आणि शिरूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत वर माजी मंत्री क्षीरसागर गटाने वर्चस्व मिळवले आहे.
बीड मतदार संघातील १७ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दहा ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने विजय मिळवला असून बीड तालुक्यातील चार आणि शिरूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या निकालात मोरगाव लिंबाजीराव जाधव, घोडका राजुरी बारकूबाई चंद्रसेन घोडके, लक्ष्मी आई तांडा अनिता राजेंद्र राठोड, वासनवाडी सुदामती सतीश शिंदे, पाडळी गहिनीनाथ पाखरे, हिवरसिंगा ज्योती विजय शिंदे, तागडगाव सुरेखा नवनाथ सानप,मालकाची वाडी मच्छिंद्र चव्हाण,खांबालिंबा बालाजी गित्ते,आर्वी मीरा यादव यांचा दणदणीत विजय झाला असून या ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत जेष्ठ नेते जगदीश काळे,विलास बडगे,मुखींद लाला,ऍड शेख खाजा,सुभाष क्षीरसागर, अरुण बोगांणे,अंकुश राठोड,चंद्रकांत पेंढारे,चिमाजी वाघमारे,डॉ अरुण भस्मे यांनी केले.