अण्णासाहेब पाटील, संतोष माने पाटील यांचा राष्ट्रवादीला दे धक्का ; बी आरएस मध्ये जाहीर प्रवेश

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १६
छत्रपती संभाजी नगर | शिवसेनेचे नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख, गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2019 चे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष माने पाटील यांचा प्रवेश भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री की चंद्रशेखरराव यांच्या हस्ते झाला. या प्रवेशामुळे गंगापूर – खुलताबाद विधानसभा मतदार संघात मोठा राजकीय भूकंप झाल्याने राष्ट्रवादीला माने पिता पुत्रांनी दे धक्का दिला आहे.
त्यांना भारत राष्ट्र समिती पक्षात आणण्यासाठी महाराष्ट्राचे पक्ष निरीक्षक जीवन अण्णा रेड्डी, मौलाना अब्दुल कदिर, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, अभय पाटील चिकटगावकर, प्रवीण अण्णा जेठेवाड यांनी सहकार्य केले.