विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा महा-राष्ट्र विकास समितीचा “लोकशाही बचाव महामेळावा” ; विधीज्ञ अण्णाराव पाटील, चंद्रशेखर आझाद (रावण) करणार मार्गदर्शन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २६
छत्रपती संभाजीनगर | नवी पिढी, नवे विचार, नवी दिशा असे ब्रीद घेऊन महा-राष्ट्र विकास समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणात पर्यायी आघाडी उभी करत विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा “लोकशाही बचाव महामेळावा” आज सोमवारी (दि.२६) छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शहरातील आमखास मैदान येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महा-राष्ट्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विकास समिती चे संस्थापक अध्यक्ष विधीज्ञ अण्णाराव पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या “लोकशाही बचाव महामेळाव्यास” आझाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (रावण), एसडीपीआयचे एम.के. फैजी, प्रज्ञा सुराज्य पक्षाचे दशरथ राऊत, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (खोब्रागडे गट) संजय बोरकर, भारतीय फारवर्डड ब्लॉक पक्षाचे अंकुश नवले, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतआप्पा उबाळे, बहुजन क्रांती पक्षाचे विधीज्ञ सतीश पालवे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा क्रांतीज्योती ब्रिगेडड विधीज्ञ नंदेश आंबाडकर, आझाद समाज पार्टी चे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, एच डी पी आय चे प्रदेशाध्यक्ष कलीम सय्यद, फकीरा दल चे प्रदेश प्रमुख सतीश कसबे, भारतीय भटके, विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव धनगावकर, राष्ट्रीय कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे, व महाराष्ट्र विकास समितीचे समन्वयक विधीज्ञ अनिरुद्ध येचाळे यांची उपस्थितीत राहील. या लोकशाही बचाव महामेळाव्याचा उद्देश देव, धर्म, जात, पंत, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहीत समाजकारण, राजकारण असून कर्जमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व लोकसंख्या नियंत्रित भारत निर्माण, उपेक्षित, वंचित, विस्थापितांसाठी सत्ता, पद, प्रतिष्ठा, आणि पैसा विरहीत राजकारण हे विचार आणि उद्देश घेऊन महा-राष्ट्र विकास समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या “लोकशाही बचाव” महामेळाव्यात प्रत्येकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महा-राष्ट्र विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.