भगवान परशुराम कुंड आमंत्रण यात्रेचे सोमवारी शहरात आगमन

विप्र फौंडेशन च्या वतीने भव्य स्वागत मिरवणूक ; क्रांती चौकात ढोल-पथकाच्या गजरात मानवंदना
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १६
विप्र फाऊंडेशन राष्ट्रीय संघटन कोलकोत्ता आयोजित ‘अमृत भारत रथ’ परशुराम कुंड आमंत्रण यात्रा श्री कामाक्षी मंदिर, कांचीपुरम ते जयपूर (राजस्थान) दरम्यान आयोजित करण्यात आलेली असुन या रथ यात्रेचे आगमन औरंगाबाद शहरात सोमवार, (दि.२१) रोजी दुपारी ३ .०० वाजेदरम्यान जालना येथून औरंगाबाद शहरातील सिडको एन ९ येथील रेणुका माता मंदिर येथे आगमन होणार असून यानिमित्त्ताने भव्य स्वागत मिरवणूक तथा क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विप्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर.बी.शर्मा, औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए. सी.एम. शर्मा व झोन १२ सी चे अध्यक्ष राजेश बुटोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देतांना सी.एम. शर्मा म्हणाले कि, भारतातील पाचवे धाम भारतातील पूर्वोत्तर अरूणाचल प्रदेशातील लोहित जिल्हातील परशुराम कुण्ड तीर्थस्थान येथे ” भगवान परशुराम जी यांची पंचधातु युक्त ५१ फुट उंच मूर्ती निर्माण कार्याचे दायित्व केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी विप्र फाऊंडेशन राष्ट्रीय संघटन (कोलकत्ता ) यांना सोपविण्यात आले आहे. या भगवान परशुराम यांच्या महान कार्याविषयी माहिती,प्रचार व प्रसार करण्याहेतु विप्र फाऊंडेशन कोलकोत्ता विश्वव्यापी संघटनांकडून ” अमृत भारत रथ परशुराम कुण्ड आमंत्रण यात्रा” आयोजित करण्यात आलेली असून दि.२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रेणुका माता मंदिर, एन ९, सिडको (जळगाव रोड ) येथे आगमन होणार असून ” माता रेणुका देवी व पुत्र भगवान परशुराम ” यांची विधीवत पुजा आरती हिमालय मधील देवभुमी गंगोत्री तपोवन येथील स्वामी चिरंजीवी रामनारायण दास जी यांच्या हस्ते होणार असल्याचे सी.एम. शर्मा म्हणाले. तद्नंतर परशुराम कुण्ड आमंत्रण रथ यात्रा सोबत दु- चाकी वाहन रॅली रेणुका माता मंदिर येथुन जालना रोड मार्ग क्रांती चौक येथे पोहोचेल. क्रांती चौक येथील श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून वाद्यवंदन व मानवंदना देण्यात येईल . तद्नंतर परशुराम कुण्ड आमंत्रण रथ यात्रा पैठण गेट- टिळक पथ- औरंगपूरा येथील परशुराम स्तंभ येथे पोहोचेल, परशुराम स्तंभ येथे विधीवत पुष्पहार घालून रथ यात्रा बलवंत वाचनालय चौक मार्ग निराला बाजार मार्ग भाग्यनगर( महिलांच्या सहभागातून येथुन पुढे मंगल कलश शोभा यात्रा सह) रथ यात्रेचे आगमन इस्कॉन मंदिर येथे होईल. तद्नंतर इस्कॉन मंदिर येथे महंत स्वामी चिरंजीवी रामनारायण दास जी यांचे आशिर्वाद पर प्रवचण तसेच परशुराम कुण्ड आमंत्रण यात्रा विषयी माहिती देण्यात येईल. न भूतो न भविष्य अशा प्रकारे वाहन रॅली काढण्यात येणार असून सर्वांनी ” पांढरे शुभ्र वस्त्र कुडता पायजमा अथवा पांढरे शर्ट पॅण्ट धारण करून कुकूंम टिळा लावून) वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन न करता शिस्तबद्ध रित्या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे सौभाग्य शहरातील सर्व नागरिकांना प्राप्त होत आहेत.तरी सहपरीवार,आप्तस्वकीय नातेवाईक सह या पवित्र धार्मिक कार्यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विप्र फौंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस विप्र फाऊंडेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर.बी.शर्माम, औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए. सी.एम. शर्मा व औरंगाबाद विप्र झोन सी चे अध्यक्ष राजेश बुटोले यांची उपस्थिती होती.
# असा असेल रथयात्रेचा मार्ग : १) श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर, जळगाव रोड, सिडको, एन ९, २) श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, एन ९, मृत्युंजय चौक, छत्रपती संभाजीनगर.,३) भगवान पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील विद्यालय रोड, ४) क्रांती गुरू लहुजी साळवे चौक, बजरंग चौक रोड, ५) हिंदूराष्ट्र चौक, ओंकार गॅस एजन्सी, सिडको, एन-७, बजरंग चौक रोड, ६) बजरंग चौक, सिडको, एन ७, ७) श्री हनुमान मंदिर रोड, सिडको, एन-५ ८) छत्रपती मार्ग, सिद्धार्थ चौक, सिडको, एन-५, ९) चिश्तीया चौक, सिडको एन ६, १०) द्वारकादास श्याम कुमार चौक, एमजीएम रोड, ११) एमजीएम रुग्णालय चौक, १२) राष्ट्रसंत तरुणसागर चौक, सेव्हनहील, १३) आकाशवाणी चौक, जालना रोड, १४) मोंढा नाका उड्डाण पूल, १५) महर्षी दयानंद चौक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्युरल, अमरप्रीत सिग्नल, जालना रोड, १६) रथयात्रा स्वागत, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, क्रांती चौक, सायंकाळी 5.00 वाजता क्रांती चौक येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, ढोल पथक च्या वाद्यवंदन सह मानवंदना देण्यात येईल. तद्नंतर सदर रथ यात्रा’ चे स्वागत मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. क्रांती चौक येथील मानवंदना कार्यक्रमात साधारणतः १५० लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यानंतर साधारणतः संध्याकाळी ६.३० वाजता सदरील ‘रथ यात्रा’ क्रांती चौक येथून पैठण गेट मार्गे टिळक पथ मार्गे गुलमंडी चौक ते औरंगपूरा पोलीस चौकी येथील श्री परशुराम स्तंभ यांना मानवंदना प्रदान करून औरंगपूरा चौक (ज्योतिबा फुले पुतळा ) मार्गे निराला बाजार मार्गे पोलीस वर्क शॉप चौकातून न्यु समर्थ नगर मार्गे ( रथ यात्रेत भाग्यनगर येथून मंगल कलश सह साधारणत ५० महिला सहभागी होतील) इस्कान मंदिर येथे ७.३० वाजता आगमन होईल. इस्कान मंदिर येथील कार्यक्रमात अपेक्षित जनसंख्या १५० च्या आसपास असेल. इस्कान मंदिर येथे परशुराम कुण्ड आमंत्रण रथ यात्रा’ स्वागत समारंभ तसेच भगवान परशुराम कुण्ड निर्माण कार्या विषयी सविस्तर माहिती प्रदान करण्यात येईल. साधारणतः या कार्यक्रमाची समाप्ती रात्री १०.०० वाजता होईल.