रविवारी श्री साईबाबा संस्थानचा १३ वा वर्धापन दिन सोहळा ; शरणापूर येथे ये है साई का दरबार साई सच्चरित्र नाटक भजन चे आयोजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१८
छत्रपती संभाजीनगर | नवसाला पावणारे ,मिनी शिर्डी ख्याती असलेले श्री क्षेत्र शरणापूर येथील श्री साईबाबा संस्थान मंदिराचा १३ वा वर्धापन दिन रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता भांगसी माता गडाजवळील श्री साई बाबा संस्थान मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सुप्रसिद्ध साई चरित्र गायक बबलू दुग्गल यांच्या ये है साई का दरबार” साई सच्चरित्र नाटक, भजन सोहळ्याचे चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साई बाबा मंदिर संस्थान मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील, कार्याध्यक्ष विशाल आदमाने पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना राजेंद्र आदमाने पाटील म्हणाले की, शरणापूर येथील श्री साईबाबा संस्थान मंदिराची मिनी शिर्डी म्हणून ख्याती आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्याची ओळख संपूर्ण मराठवाड्यात या मंदिराची आहे. श्री साईबाबांच्या दर्शनाने अनेकांना विविध अनुभव आले असून जे भक्त ५ गुरुवार दर्शन करतात त्यांना याची अनुभूती आल्याचे राजेंद्र आदमाने यांनी सांगितले. मंदिर संस्थानाच्या माध्यमातून गरीब मुलांना अन्नदान, विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच अनेक गोर-गरीब मुलींचे लग्न मंदिर परिसरात लावण्यासाठी माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाते. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला ३० डिसेंबर रोजी श्री साईबाबा संस्थान मंदिराची भव्य पालखी चे प्रस्थान येथून होते. या पालखीत विविध भागातून मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी होतात. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य साई सोहळ्यात महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने शरणापूर येथे श्री साईबाबा मंदिर संस्थान च्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई बाबा मंदिर संस्थान मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील, कार्याध्यक्ष विशाल आदमाने पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.