विधवा महिलांना हळदी कुंकू देत सन्मान ; एम आय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा लि च्या वतीने ए-वन ग्रुपचा अनोखा उपक्रम

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२९

छत्रपती संभाजीनगर |आयुष्याचा जोडीदार या जगात नसला तरी त्या विधवा महिलांना समाजात मान-सन्मान मिळाला पाहिजे, सुवासिनी सारखे जगता आले पाहिजे, तसेच रूढी परंपरे नुसार आयोजित कार्यक्रमात सहभागी होता आले पाहिजे या उदात्त हेतूने शहरातील ए-वन ग्रुप च्या वतीने विधवा महिलांना हळदी कुंकू देत त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. एमआय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा.लि. च्या वतीने ए वन ग्रुप च्या प्रमुख अनु चव्हाण यांनी भानुदास चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हळदी कुंकू हि महाराष्ट्रातील संस्कृतीतील परंपरा आहे. मकर संक्रांति नंतर घरोघरी महिलांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात येते. मात्र ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे अशा महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या जात नाही. त्यांनाही हा सुवासिनी महिलांसारखे जगता यावे, त्यांनाही समाजातील मान-सन्मान मिळावा हि प्रामाणिक भावना ठेवून ए वन ग्रुप च्या वतीने विधवा महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केल्याचे मत ग्रुप च्या प्रमुख अनु चव्हाण यांनी व्यक्त केले. या वेळी विविध मनोरंजनात्मक गेम शो आयोजित करून महिलांचा उत्साह वाढविण्यात आला. या उपक्रमातील विजेत्या महिलांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए वन ग्रुप च्या चित्रा थोरात, मनीषा काळे, योगिता गोल्हार, उज्वला आठवले, मंदा साठे, मीना तांगडे, सोनल फुलझेले, संगीता डोंगरदिवे, सरला सदावर्ते, रंजना सोळस, सुश्मिता साबळे, शोभा सदावर्ते यांनी पुढाकार घेतला.

विविध गेम शो मध्ये ज्योती शिरसाड, प्रियांका आढाव, सविता राठोड, विशाखा गवई, सोनल फुलझले, आशा कीर्तने, महानंदा उचित, उषा पाबळे, हे विजेते ठरले. त्यांना ए वन ग्रुप च्या वतीने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल सविता राठोड विविध गीत गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. तर साक्षी तांगडे, वैष्णवी चव्हाण, प्राजक्ता अहिरे, वीरा चव्हाण, मोक्षदा लहासे, विधी चव्हाण, वीर चव्हाण, हरिओम यादव, यांनी विविध नृत्य सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए वन ग्रुप च्या प्रमुख अनु चव्हाण यांनी केले.

हळदी कुंकू हि महाराष्ट्रातील संस्कृतीतील परंपरा आहे. मकर संक्रांति नंतर घरोघरी महिलांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात येते. मात्र ज्यांच्या पतीचे निधन झाले 

आहे अशा महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या जात ना

ही. त्यांनाही हा सुवासिनी महिलांसारखे जगता यावे, त्यांनाही समाजातील मान-सन्मान मिळावा हि प्रामाणिक भावना ठेवून ए वन ग्रुप च्या वतीने विधवा महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला.

– अनु चव्हाण,  एव-वन ग्रुप प्रमुख

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!