“देस मेरा रंगीला” नृत्य व गीत गायन स्पर्धेचे १२ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन ; भारतीय स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रंगणार देशभक्तीचा अमृत महोत्सवी सोहळा

कलेतून राष्ट्रभक्ती जागृतीसाठी युवामित्र फाउंडेशनचे दशकपूर्ती आयोजन
७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त होणार ७५ कलावंत, पत्रकार, खेळाडूंचा सन्मान
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२४
छत्रपती संभाजी नगर | भारतीय स्वातंत्र्याला व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. हेच औचित्य साधुन देशभक्तीची भावना प्रत्येक विद्यार्थी, तरुणांमध्ये जागृत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त युवामित्र फौंडेशन च्या वतीने “देश मेरा रंगीला’’ या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी नगर महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार, यांच्या सहकार्याने बिपीन मोशन पिक्चर्स, देवेन टीव्ही, व आदर्श फिल्म प्रॉडक्शन, वेब न्युज लाईव्ह महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, (दि.१२ ऑगस्ट) सकाळी ११ वा. उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंग मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील ७५ कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती युवामित्र फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संयोजक सचिन अंभोरे यांनी दिली.
या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून शहरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. भारतीय कलांचे संवर्धन, जतन व्हावे या हेतुने छत्रपती संभाजी नगरच्या स्थानिक कलावंताच्या संकल्पनेतुन या सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये देशभक्तीपर नृत्य व गीत गायनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात समुह नृत्यासाठी शहरातील शाळा/महाविद्यालय तसेच विविध खाजगी डान्स ग्रुप सहभागी होणार असून शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये नर्सरी ते ४ थी अ गट, ५ वी ते १० वी ब गट आणि महाविद्यालयीन, खुल्या डान्स ग्रुप साठी क गट असेल. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मुख्य संयोजक संयोजक सचिन अंभोरे, देवेन टीव्हीचे संचालक देवन करवडे, बिपीन मोशन पिक्चर्स चे संचालक नितीन अंभोरे, आदर्श फिल्म प्रॉडक्शन चे संचालक सचिन ठोकळ, लाईव्ह महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक भास्कर निकाळजे, टेक्नीकल हेड कृष्णा लोखंडे, अभिजित गवळी, द लीडर मासिकाचे संपादक अरुण सुरडकर, विजय अवसरमोल, नृत्य दिग्दर्शक राहुल काकडे, संजय जाधव, निकेश म्हस्के, सागर कापडे, निवेदक लोकेश कुमावत, नीलम गलांडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जया दणके, राहुल सोनवणे, संदीप गवळी, कोमल बंन्सवाल, नेहा पाटील, मानसी आमडेकर, जया दणके, नंदिनी ठाकूर, सीमा फोलाने, सोनल कीर्तीशाही, ऐश्वर्या पवार, इशिता काळे,राजेश्वरी पवार, योगेश सुरडकर अमोल मगरे, आकाश ठोकळ, उदय जऱ्हाड, निलेश कड, नितीन दीक्षित, किशोर गिरी, अशोक काळे, चेतन नवगीरे, प्रविण नन्नवरे, योगेश देशमुख, रोहित भांगे, सुमित वाठोरे, धम्मा जाधव, संदीप तांगडे, गोपाल आवारे, दादासाहेब बनसोडे, भूषण गवळी, कुणाल भिसे, शुभम पगारे, वाल्मिक जाधव, आदी पुढाकार घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९९७०४०९६४० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
\