रशियाने डागले पोलंडवर क्षेपणास्त्र, जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक

एकीकडे जागतिक पातळीवर जी-२० परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शास्वत विकास, पर्यावरण संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!