तीस गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे शिक्षण ; डॉ. सुधीर गव्हाणे

रोटरी क्लब तर्फे औरंगाबाद भुषण पुरस्कार डॉ. सुधीर गव्हाणे प्रदान
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २५
छत्रपती संभाजीनगर | चाणक्य करिअर ॲकादमी, एमजीएम विद्यापीठ आणि रोटरी क्लब यांनी संयुक्त रित्या गरीब आणि होतकरु, अशा ३० मुलांना मोफत स्पर्धा परीक्षेची शिक्षण द्यावेत. यासाठी सवलत अथवा काही न बघता त्यामुलांची गुणवत्ता बघावी. यातून मराठवाड्यातून आयएएस घडवावेत. अशा प्रस्ताव डॉ.गव्हाणे यांनी मांडला.त्या प्रस्तावास चाणक्याचे अविनाश धर्माधिकारी, रोटरी क्लब आणि एमजीएमचे कुलपती कदम यांनी मान्यता दिली असून लवकच त्यांची निवड करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे शनिवारी(ता.२४) एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात औरंगाबाद भुषण पुरस्कार डॉ.सुधीर गव्हाणे यांना अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी डॉ.गव्हाणे बोलत होते. यावेळी एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष दीपक पवार,अनय फणसळकर, मिलिंद सेवलीकर, शैलेश तुळापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटीरीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ.गव्हाणे म्हणाले की, माझ्या सारख्या ग्रामीण भागातील आलेल्याला ओळख दिली. उभे केले.सर्वसमान्यापासून ते कुलगुरुपर्यंत काम करण्याची संधी दिली.पत्रकारिता हा समाजाचा हिताचा विभाग होता. पण आता तो सध्याच्या पत्रकारिता हा खाजगी उद्योग झाला आहे.पुर्वी माध्यमातील अग्रलेख वाचण्यासाठी लोकांची तळमळत होते.आता सर्वच बदल झाले. चालले असल्याचे सांगत बदल्या पत्रकारितेवर भाष्य केले. मात्र डिजिटल मिडीयामुळे सर्वसमान्याचे प्रश्न मार्गी लागू शकत आहे. दुसरे संशोधनात आपण बरेच मागे आहे. देशाच्या जीपीडीतीही संशोधनाशी संबंधीत केवळ ०.७ टक्के इतकाच खर्च हा आरएनडीवर केला जातो. या तुलनेत जापान ३.२ टक्के, अमेरिका २.३ टक्के, चीन २ टक्के खर्च करीत आहे. संशोधनातून नवीन उत्पादन, नवीन उद्योग उभा राहू शकतो.उद्योगाला चालना मिळत यातून रोजगार निर्माण होऊ शकतो. असेही गव्हाणे म्हणाले. डॉ. गव्हाणे यांनी आत्मचरित्र लिहावे- धर्माधिकारी डॉ. गव्हाणे यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. नवीन तंत्रज्ञानापासून ते संशोधनापर्यंत सर्वच गोष्टीत त्यांचा अभ्यास आणि अनुभव आहे. त्यांच्या आत्मचरित्र नव्या पिढीला उपयोगी ठरेल, असे अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. यासह डॉ.गव्हाणे यांनी एक मुलीला स्पर्धापरीक्षेसाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्या मुलीस स्पर्धा परीक्षेस मार्गदर्शन करण्याची तयारी धर्माधिकारी यांनी सांगितले.