सलग १३ व्या वर्षी श्री साई बाबा मंदिर शरणापुर येथून पालखी सह पदयात्रा शिर्डी कडे प्रस्थान

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३१
छत्रपती संभाजीनगर | श्री साई बाबा मंदिर शरणापुर येथून सलग १३ व्या वर्षी पालखी सह पदयात्रा वाजत गाजत मोठ्या उत्साहात शिर्डी कडे प्रस्थान करण्यात आली. सर्व प्रथम पूजा करून श्री साईबाबा मंदिर संस्थान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील यांच्या व सर्व मान्यवर साईभक्त पालखी समिती यांच्या हस्ते व उपस्थितीत महाआरती करण्यात आली व लगेच पालखी प्रस्थान झाली.
पालखी सह पदयात्रा १ जानेवारी ला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी येथे साई बाबा मंदिरात पोहचते व शिर्डी येथे देखील मोठ्या उत्साहात मिरवणूक कडून पालखी साईबाबा समाधी मंदिरात पोहचते.अचूक नियोजन कोणत्याही भक्तांना कसला ही त्रास किंवा कोणत्या ही सुविधेचा अभाव जाणवत नाही ही या पालखीचे आणखी एक विशेष आहे.सर्व साईभक्त देखील संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील साहेब यांनी दिलेल्या सर्व सूचना पाळून काटेकोर पणे शिष्तीचे पालन करतात.पालखी मध्ये सोबत सर्व अचूक व्यवस्था वाहने देखील आहेत. आज या प्रस्थान सोहळा वेळी श्री साई बाबा मंदिर शरणापुर चे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र आदमाने,अर्जुन आदमाने पाटील, पोपटराव आदिक, काकासाहेब चेळेकर, सांडू पवार,विशाल आदमाने पाटील,रुपचंद जैन , बंडू मोरे,पंडित कदम, सुमित जैन व भूमी पुत्र सेवा भावी संस्थेचे सर्व सदस्य,पंचक्रोशीतील सर्व मान्यवर साईभक्त महिला व सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते.