१६ डिसेंबरपासून चित्रपटगृहात झळकणार धोंडी चंप्या ; एक प्रेम कथा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १४  

मुंबई | ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली. चित्रपटाचे नावच इतके कमाल आहे, त्यामुळे चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, हे एकंदरित दिसतेय. जसजसे या चित्रपटाचे पोस्टर, गाणी, टिझर, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले, तसतशी  ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. आता लवकरच हे धोंडी चंप्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात विनोदाचा तडका आहे. यात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या सिनेमात गोष्ट एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे. ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघांमध्ये शत्रुत्व असल्याने त्यांच्यात सतत खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे प्रेक्षकांना १६ डिसेंबरपासून चित्रपटगृहात कळेल.

या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सौरभ आणि दुर्गेश यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना गणेश निगडे, गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांचे बोल लाभले आहेत. तर अवधूत गुप्ते, वैशाली सावंत, सना मोइदुट्टी, सौरभ शेटये यांनी ही गाणी गायली आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!