“देश मेरा रंगीला’’ नृत्य व गीत गायन स्पर्धेत तरुणाईचा जल्लोष ; अभिनेत्री अभिनेत्री सीमा कुलकर्णी, अभिनेता रोहन शिंदेंनी जिंकली स्पर्धकांची मने ; स्पर्धक, रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद  ; देशभक्ती गीतावर थिरकली तरुणाई

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कलावंतांचा सन्मान ; दशकपूर्ती पर्व सोहळा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर | दि.१४ : देश मेरा रंगीला… मेरा रंग दे बसंती चोला…कंधो से मिलते हे कंधे, कदमो से कदम मिलते है… आय लव्ह माय इंडिया… सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो… सबसे आगे होंगे हिंदुस्थानी…ऐ वतन आबाद रहे तू… दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिये अशी देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या गीतावर गीत गायन, नृत्य सादरीकरण करून “देश मेरा रंगीला” या स्पर्धेत तरुणाईचा जल्लोष दिसून आला. युवामित्र फाउंडेशन निर्मित व लाईव्ह महाराष्ट्र प्रस्तुत “देश मेरा रंगीला” या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.१२) संत एकनाथ रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी “सावली होईन सुखाची” या मालिकेची प्रसिद्ध अभिनेत्री सीमा कुलकर्णी, अभिनेता रोहन शिंदे यांनी उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमात रंगत आणली.

या स्पर्धेचे उदघाटन भगवान बाबा अनाथ बालीकाश्रामातील मुलींच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य सुनील वाकेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रेस फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्युट च्या संचालिका वर्षाराणी खोचे, सुभाष पाटील, प्रा.डॉ.समाधान इंगळे, भरत कल्याणकर, भगवान बाबा आश्रमाच्या संचालिका कविता वाघ, यांची उपस्थिती होती. युवामित्र फौंऊशनचे अध्यक्ष व संयोजक सचिन लीला सुखदेव अंभोरे, देवेन करवाडे, यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य, सिनेमा, व क्रीडा, क्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील ७५ कलावंतांचा अमृत महोत्सवानिमित्त सन्मान करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात कवी, लेखक निवेदक, प्रा.डॉ.समाधान इंगळे, प्रा.अनिलकुमार साळवे, गायक कुणाल वराळे, रांगोळीकार प्रदीप पवार, शाहीर अजिंक्य लिंगायत, यांचा कला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य सुनील वाकेकर म्हणाले कि, देशासाठी देशातील माणसांचे संरक्षण करणे हि आपली प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे खरी देशभक्ती आजच्या पिढी मध्ये जागृत करायची असेल तर आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आणि आजची पिढी अशा या देशभक्तीपर  सांस्कृतिक कार्यक्रमातून करेल असा विश्वास व्यक्त करत युवा मित्र फौंऊडेशन च्या दशकपुर्ती पर्व सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. तर अभिनेत्री सीमा कुलकर्णी म्हणाली कि, देश मेरा रंगीला या नृत्य गीत गायन स्पर्धेतून मला माझ्या बालपणीची आठवण झाली. अशा कार्यक्रमातूनच कलावंत घडत असतात म्हणून मी ही या कलाक्षेत्रात माझे करियर घडवू शकले. कलेची निस्वार्थपणे साधना करा, प्रचंड मेहनत, कष्ट करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल असे सांगत त्यांनी सहभागी सर्व कलावंताना शुभेच्छ्या दिल्या. युवा मित्र फाऊडेशनने कलावंताना केवळ व्यासपीठच नाही दिले तर प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योतही पेटवली आहे. माझ्याही खूप आठवणी रंगभूमीवर असल्याच्या आठवणी सांगत स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलावंताना अभिनेता रोहन शिंदे यांनी शुभेच्छ्या दिल्या. विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

समूह नृत्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अनुक्रमे अ गटात युरिका इन्फोसिस, प्रतिक देवळे स्कूल, मनपा प्राथमिक शाळा, किराडपुरा, ब गटात द जैन स्कूल, एस.व्ही.पी.एस. स्कूल, युरिका इन्फोसिस स्कूल, क गटात एमजीएम स्कूल तर ड गटात सुरज ग्रुप, व अनस्टेपेबल ग्रुप, शिवछत्रपती महाविद्यालय तर समुय गायनात अनुक्रमे पीएसबीए स्कूल, जीसा स्कूल, स्वामी विवेकानंद, वरद विद्यामंदिर, ज्ञानदीप विद्यालय, संत मौनी स्कूल, द वर्ल्ड स्कूल, भगवान महावीर स्कूल, संस्कृती ग्लोबल स्कूल, नादगंधर्व स्कूल हे पारितोषिकांचे मानकरी ठरले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विशेष रंगभूषा, उत्कृष्ट सादरीकरण, गायन, वेशभूषा, गीत गायन स्पर्धेतील गीतांना निखील प्रधान, विजेंद्र मिमरोट, अमर वानखेडे, यांनी संगीतबद्ध केले. गीत गायन स्पर्धेचे परीक्षण प्रा.केदार देशमुख, शेखर काटनेश्वर, नितीन गायकवाड, प्रा. रमेश धोंडगे, प्रा. शरद लोखंडे यांनी तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण सुशील कुमार बनकर, वैजनाथ राठोड, निकेश म्हस्के, अर्जुन टाक यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लोकेश कुमावत, नीलम गलांडे, भावना कुडे, अंजली चिंचोलीकर यांनी केले. या स्पर्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा पाटील, सचिन ठोकळ, संदीप तांगडे, कृष्णा लोखंडे, शुभम पगारे, अभिजित गवळी, नितीन अंभोरे, राहुल सोनवणे, भास्कर निकाळजे, गौरव तायडे, विशाल मंदेलवाड,  अमोल मगरे, आकाश ठोकळ, प्रविण नन्नवरे, रोहित भांगे, रोहन लसगरे, शुभम उघडे, कपिल वाघ, शुभम पाचपुते यांनी पुढाकार घेतला.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!