विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द ; उदय सामंत यांची माहि

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ५
छत्रपती संभाजीनगर | शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोला’ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी छत्रपती संभाजी नगर चे पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रा. रमेश बोरणारे, आमदार प्रदीप जैस्वाल, मासिआचे अध्यक्ष किरण जगताप, तसेच मासिआ चे पदाधिकारी उपस्थित होते. पाच ते आठ जानेवारीदरम्यान ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर – मासिआ यांच्या वतीनं, हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, ऑरिक सिटीत होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाले असून या एक्स्पो मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योग सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने विविध परिसंवादाचं आयोजन करण्यात आले आहे.