छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवा, अन्यथा आम्ही स्वखर्चातून जय भवानी नगर चौकात बसवू ; महापालिका प्रसासानाला अभिजित देशमुख यांचा इशारा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२
छत्रपती संभाजी नगर | जय भवानी नगर-संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्मारक मागील १० महिन्यांपासून तयार असूनही झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाने अद्यापही हा अश्वारूढ पुतळा जय भवानी नगर येथील चौकात बसविला नाही. यामुळे शिवप्रेमींच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला जात असून येत्या १५ दिवसांत तातडीने महाराजांचा पुतळा बसवावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगर च्या वतीने आम्ही स्वखर्चातुन सदरील महाराजांचा पुतळा जय भवानी नगर चौकात बसवू असा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांनी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाला दिला आहे.
जय भवानी नगर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या ठिकाणी गेल्या १० महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला नाही. मोठी वर्दळ असलेल्या या भागातील शिवप्रेमींनी अनेकवेळा मागणी करूनही महापालिका प्रशासनाने महाराजांचा पुतळा बसविण्याची कार्यवाही केली नाही. परिणामी शिवप्रेमीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच पुढील कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत तातडीने महाराजांचा पुतळा बसवावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने आम्ही स्वखर्चातुन सदरील महाराजांचा पुतळा जय भवानी नगर चौकात बसवू असा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांनी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाला दिला आहे.