आर बी युवा मंच तर्फे गुरुवारी भव्य दिव्य राम नवमी उत्सव ; शिवभक्त श्रद्धा शिंदे मुख्य आकर्षण ; मंत्री दानवे, सावे यांची विशेष उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २८
छत्रपती संभाजीनगर | आर बी युवा मंच च्या वतीने गुरुवारी (दि.३०) भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सव एन-६ येथील अविष्कार चौकात सायंकाळी ५ वा. साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात मुख्य आकर्षण म्हणून कट्टर शिवभक्त श्रद्धा शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, देवगिरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विनोद पाटील, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, प्रशांत सूरगोणीवार, समाजसेवक विशाल भुजबळ यांची उपस्थिती राहील. या महोत्सवाचे आयोजन आर बी युवा मंच चे राहुल बोरोले यांनी केले असून सिंहगड मित्र मंडळाने विशेष सहकार्य केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आर बी युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.