छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मंगळवार मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू

पाच पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२३   

 छत्रपती संभाजीनगर | पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मंगळवार, दिनांक २५ मार्च २०२५ च्या मध्यरात्रीपासून तर मंगळवार, दिनांक ८ एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

येत्या २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन, २९ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस, ३० मार्च रोजी मराठी नववर्ष गुढीपाडवा, ३१ मार्च रोजी रमजान ईद, व संत झुलेलाल जयंती, ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी, आणि ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असल्याने या काळात शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच मराठा समाज आरक्षण मागणी, धनगर, मुस्लीम आरक्षण मागणी यासह औद्योगिक क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांच्या वतीने आंदोलन, मोर्चा, तसेच उपोषण करण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची कबर ताळेबंद करा या मागणी करिता विश्व हिंदू परिषद, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्टान, बजरंग दल यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनेच्या वतीने धरणे, मोर्चे, उपोषण आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. या विविध आंदोलनामुळे छत्रपती संभाजी नगर शहरात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात जमाव बंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने यासंदर्भातील पत्रक पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या स्वाक्षरी ने आदेशित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना माहितीस्तव देण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त ५ पेक्षा अधिक व्यक्ती शहरातील संवेदनशील भागात आढळल्यास किवा सदरील व्यक्ती जवळ इतरांना इजा पोहचेल अशा कोणत्याही वस्तू आढळल्यास त्यांच्यावर पोलीस कायादिशीर कारवाई करतील असे आदेशित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!