ममतादिनानिमित्त माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना उद्या गुलमंडी येथे अभिवादन ; शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची माहिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ५
छत्रपती संभाजीनगर | तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची ६ जानेवारी रोजी जयंती असते. सर्वत्र ममता दिन म्हणून साजरा होत असतांना त्यानिमित्त शिवसेना संभाजीनगरच्या वतीने गुलमंडी येथे शुक्रवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली. यावेळी आलाप ग्रुपतर्फे भावभक्तीगीतांनी आदरांजली वाहण्यात येणार आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत यांची विशेष उपस्थित असणार आहे. या अभिवादन कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, सह संपर्कप्रमुख त्रिम्बक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजुरकर, राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा समन्वयक माजी महापौर कला ओझा, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, स्वप्नील दिंडोरे, रामेश्वर कोरडे, आदित्य दहिवाल यांनी केले आहे.