ॲपेक्स हॉस्पिटलच्या वर्धापन दिनी १२५ जणांचे रक्तदान ; महिला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; सामाजिक भावनेतून वर्धापन दिन साजरा

छत्रपती संभाजी नगर | सामाजिक भावनेचे व्रत घेऊन गेल्या २० वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात विविध आजारांवर माफक दरात रुग्णांना उपचार सेवा देणाऱ्या बसैय्ये नगर, जालना रोड येथील पेक्स सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मंगळवारी (दि.१८) १२५ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात महिला रक्तदात्यांची अधिक संख्या होती. अशी माहिती प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. भावना टाकळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

ॲपेक्स हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सोयी सुविधांनी मेंदू विकार विभाग कार्यरत आहे. रुग्णांना वेळेत आणि समाधानकारक उपचार सुविधा मिळावी यासाठी प्राधान्याने परिश्रम घेतले जातात. अनेक रुग्णांना अत्यावश्यक वेळी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे रक्तदात्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी २०० हून अधिक रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्याचे  उद्दिष्ट या २१ व्या वर्धापन दिनाचे होते. या शिबिराला रक्तदात्यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हे रक्तदान शिबीर यशस्वी केल्याचे डॉ. भावना टाकळकर यांनी सांगितले.  प्रत्येक रुग्णांना मदतीचा हात देण्याचा हा एक निस्वार्थ प्रयत्न असून रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे  डॉ.भावना टाकळकर यांनी सांगितले.  या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी डॉ.अब्दुल माजीद, डॉ.आशिष कठाळे, डॉ. नाहुश पटेल, मॅक्सिलोफेशियल आणि ओरल सर्जरी विभागाचे डॉ. सीमित शाह, दंतचिकित्सा विभागाचे डॉ. प्राजक्त बिनायके, ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ.एम.बी. लिंगायत, डॉ. श्रीपाद जोशी, मानोसोपचार विभागाचे डॉ. अमोल अशोक देशमुख, डॉ.विक्रांत पाटणकर, न्युरोलॉजीस्ट डॉ.अभिनंद पोटपेलवार, फ़िजिओथेरपिस्ट डॉ. शैलेंद्र लेंडे, आहारतज्ञ विभागाच्या डॉ.अस्मि भट्ट, पॅथॉलॉजी विभागाच्या डॉ.सारा माजीद, यांची उपस्थिती होती. गेल्या २० वर्षामध्ये असंख्य गोर-गरीब रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध सुविधेत गंभीर आजारांवर ॲपेक्स हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे निदान झाल्याने प्रत्येक रुग्ण समाधानी झाला आहे  असे मत यावेळी उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केले.

२४ तास अत्यावश्यक सेवा असल्याने अपघातात गंभीर झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार करण्यासाठी अपघात विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेहमीच सज्ज असते. त्यामुळे देशभरातील कोणताही रुग्ण या हॉस्पिटल मध्ये आपले उपचार माफक दरात घेऊ शकतात हा विश्वास ॲपेक्स हॉस्पिटलने निर्माण केल्याने यंदाचा २१ वा वर्धापन दिन सामाजिक भावना ठेवत निस्वार्थ हेतूने रक्तदानाच्या सेवाव्रताने साजरा करण्यात आला. दत्ताजी भाले रक्त पेढीच्या वतीने डॉ. दिलीप डांगे, र्न्साम्पर्क अधिकारी आप्पासाहेब सोमासे, गजानन वाघ, मनीषा मुसळे, आरती बामणे, रेवती जोशी, कोमल दाभाडे यांनी रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!