‘पुष्पा २’ चित्रपटामधील “अंगारो का अंबर सा लगता है मेरा सामी” गाण्याची सोशल माध्यमावर धूम ; श्रेया घोषाल च्या आवाजातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष

तीन तासांत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज ; येत्या १५ ऑगस्टला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट प्रदर्शित होणार

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिलं-वहिलं गाणं ‘पुष्पा-पुष्पा’ प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ते गाणं प्रदर्शित झालं आहे, ज्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होती.

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचं नाव ‘अंगारों’ असं आहे. चित्रपटातील हे रोमँटिक गाणं असून आज त्याचा लिरिकल व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओत गाण्यांचं मेकिंग दाखवण्यात आलं आहे. तर बॅकग्राउंडला ‘अंगारों’ गाणं ऐकलं जाऊ शकत. विशेष म्हणजे या व्हिडीओमधील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हटके हुक स्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायलं आहे. तर रकीब आलम यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच ‘अंगारों’ गाण्याच नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील हे गाणं आता युट्यूबवर ट्रेंड होतं आहे. या गाण्याला तीन तासांत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, ‘पुष्पाः द राइज’ चित्रपटात अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने आपल्या जबरदस्त डान्स, अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटातील तिचं ‘ऊ अंटवा’ या आयटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातून समांथाचा पत्ता कट झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. समांथाची जागा आता बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी घेणार आहे. येत्या १५ ऑगस्टला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. ५०० कोटी रुपये या चित्रपटावर एकूण खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. शिवाय नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे.

‘पुष्पा २’ चित्रपटामधील “अंगारो का अंबर सा लगता है मेरा सामी” हे गाणे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!