लोकशाही विसरून बेबंदशाहीला सुरुवात ; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १७
मुंबई | शिंदे गटाच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर अत्याचार होत असून या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाणार आहोत. शिवसेना हि लेचीपेची नाही, ज्या धनुश्याबानाची पूजा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे खरा देव्हाऱ्यात असणारा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असून त्याचा ते जल्लोष करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हि लढाई आपल्याला शेवट पर्यंत लढायची आहे त्यामुळे आपण कोणीही खचून जाऊ नका असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जनता याचा बदल येत्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. शंभर कौरव एकत्र आले म्हणजे पांडव हरले नाहीत. रामायणात जसा रामाचा विजय झाला तसा आमचाही विजय होईल असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टात आमच्याच बाजूने निकाल लागेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला असून चोर कधीही मर्दानगी दाखवू शकणार नाही. जर शेणच ख्यायाचे होते तर अमला एव्हढा खटाटोप कशाला करायला लावला असा संताप त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अन्यायाचा सामना करा, अन्यायाला लात मारा असे बाळासाहेबांनी सांगितले आहे. बाळासाहेबांनी गुलाम व्हायचे सांगितले नाही. मग प्रतीज्ञापत्राचे एवढे थोतांड निवडणूक आयोगाने कशाला केले असा संतापजनक सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे आता येत्या काळात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.