राज्य क्रीडा महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन ; पाचही मैदाने सज्ज ; आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांची उपस्थिती

राज्य क्रीडा महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन ; पाचही मैदाने सज्ज ; आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांची उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२

छत्रपती संभाजी नगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मैदान सात वर्षानंतर पुन्हा एकदा राज्यभरातून आलेल्या खेळाडूच्या गर्दीने गजबजून जाणार आहे. राज्य क्रीडा महोत्सवाच्या पूर्व संध्येलाच सघ दाखल झाले असून सर्व मैदाने खेळासाठी तर प्रेक्षक खेळाडूंच्या प्रतीक्षेत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणा-या राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळयात प्रकारातील दोन हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार असून ऑलंपिकपट्टू धनराज पिल्ले यांच्यासह मान्यवर मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व कृषी, अकृषी विद्यापीठाचा क्रीडा महोत्सव ३ ते ७ डिसेंबर दरम्यान सहभाग होणार आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन ३ डिसेंबरपासून विद्यापीठामध्ये होणार आहे. स्पर्धेत एकूण पाच खेळांचा समावेश असून अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो पुरुष व महिला गटाचा समावेश यामध्ये आहे. या स्पर्धा विद्यापीठ क्रीडा विभाग परिसर येथे होत आहेत. स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दि.तीन दुपारी ३ वाजता होणार आहे. वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मा.ना.डॉ.भागवत कराड, (केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भारत सरकार), मा.ना.गिरीष महाजन (क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र) व अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिकपट्टू धनराज पिल्लई (प्रख्यात हॉकीपटू) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मराठवाडयातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : मा.कुलगुरु
सप्टेंबर रोजी होणा-या १९९८, २०१४ व २०२२ अशा तीन महोत्सवाचे यजमानपद आपल्या विद्यापीठाला  मिळाले. पुर्वीच्या दोन्ही महोत्सवाप्रमाणेच यंदाचा हा महोत्सवही अत्यंत उत्तमरितीने आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडयातील खेळाडूंना प्रेरणा देणारा व विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणारा हा महोत्सव ठरेल, असा विश्वास मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!