मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “देस मेरा रंगीला” नृत्य, गीत गायन स्पर्धा पोस्टर चे प्रकाशन ; १४ ऑगस्ट रोजी रंगणार ११ वा देशभक्तीचा स्वाभिमानी सोहळा ; कलेतून राष्ट्रभक्ती जागृतीसाठी युवामित्र फौंडेशनचे आयोजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ४ :
छत्रपती संभाजीनगर | मराठवाड्यातील सर्वात मोठा देशभक्तीचा ११ वा स्वाभिमानी सोहळा यंदा विद्यार्थी कलावंतांच्या बहारदार सादरीकरणाने रंगणार आहे. “देस मेरा रंगीला” या आंतर शालेय व महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धा कार्यक्रमाच्या पोस्टर चे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२) करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी संत एकनाथ रंग मंदिर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान युवामित्र फौंडेशन च्या वतीने आयोजित हा स्पर्धा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आपल्या धाडसी कर्तुत्वाने भारतीय सैन्य दलाने कारगिल युद्ध जिंकले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देत यंदा कारगिल विजयाचा रौप्य महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत असून त्यांच्या शौर्याचे स्मरण करत देस मेरा रंगीला हा स्पर्धा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान देस मेरा रंगीला या स्पर्धा कार्यक्रमाच्या पोस्टर चे प्रकाशन करून संपूर्ण देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशभक्तीची भावना प्रत्येक विद्यार्थी, तरुणांमध्ये जागृत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाच्या स्वाभिमानी सोहळ्यानिमित्त युवामित्र फौंडेशन च्या वतीने “देश मेरा रंगीला’’ या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी नगर महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार, यांच्या सहकार्याने बिपीन मोशन पिक्चर्स, आदर्श फिल्म प्रॉडक्शन, वेब न्युज लाईव्ह महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील कलावंतांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती युवामित्र फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी दिली.
या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून शहरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. भारतीय कलांचे संवर्धन, जतन व्हावे या हेतुने छत्रपती संभाजी नगरच्या स्थानिक कलावंताच्या संकल्पनेतुन या सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात समुह नृत्यासाठी शहरातील शाळा/महाविद्यालय तसेच विविध खाजगी डान्स ग्रुप सहभागी होणार असून शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये नर्सरी ते ४ थी अ गट, ५ वी ते १० वी ब गट आणि महाविद्यालयीन, खुल्या डान्स ग्रुप साठी क गट असेल. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवामित्र फौंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9970409640 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.