संत एकनाथ रंगमंदिरात आज रंगणार गजर विठ्ठलाचा आषाढी महोत्सव ;  माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे अभिनेत्री वर्षा उसगावकर निर्मला दानवे यांच्या हस्ते होणार विठ्ठल पूजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१७  

छत्रपती संभाजीनगर : मागील २६ वर्षापासून अखंडपणे आणि सातत्याने डॉ.आत्माराम सरकटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व मातोश्री हंसादेवी सरकटे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित प्रा. राजेश सरकटे यांची निर्मिती व संकल्पना असलेला ‘गजर विठ्ठलाचा’ हा आषाढी महोत्सव शहरातील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये (दि.१७) सायं.७.४५ वाजता सादर होईल.

या आषाढी महोत्सवाचे उद्घाटन व विठ्ठल पूजन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर, निर्मला दानवे यांच्या हस्ते होणार आहे. तर विशेष उपस्थिती अभिनेत्री अनुष्का सरकटे व अभिनेते निखिल चव्हाण यांची असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे खा.संदिपान भुमरे, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाठ आ.संतोष दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी  पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवामध्ये राजेश सरकटे, नितीन सरकटे व पायल सरकटे  विविध संत महंतांची अविट अशी भक्तीगीते सादर करणार असून निवेदन प्रा. रवींद्र मगर करणार आहेत.         या कार्यक्रमांमध्ये साथसंगत संगीतकुमार मिश्रा (सारंगी, मुंबई) प्रथमेश साळुंखे (बासरी, मुंबई) सिद्धांत व्यवहारे ( तबला) विजेंद्र मीमरोट, रविंद्र प्रधान तांबे, अंकुश बोर्डे, विजय खंडागळे करणार आहेत. या भक्ती संगीत महोत्सवास सर्व विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.राजेश सरकटे, संजय सरकटे, विनोद सरकटे, नितिन सरकटे, संयोजन समिती : संजय सरकटे, विठ्ठल गडदे, विनोद सरकटे, राजेंद्र पवार, भगवान राऊत, भागवत काकडे, संतोष शर्मा, विपुल शर्मा, किरण चिखले, संतोष लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!