संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केले पाहिजे ; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ; सर्वपक्षीय आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उद्घाटन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१२
छञपती संभाजीनगर | जगात कोणीही बदलू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. शिक्षणात, आरक्षणात आणि कायद्यात तरतुद करण्यात आलेले संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. निराला बाजार, ओल्ड केएफसी बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जिल्हा जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे माजी खासदार तथा शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.११) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. रमेशभाई खंडागळे यांची उपस्थीती होती. यावेळी प्रास्ताविक मुख्य समन्वयक गौतम लांडगे यांनी केले. कार्याध्यक्ष दिनकर ओंकार, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य सल्लागार मिलिंद दाभाडे, स्वागताध्यक्ष गौतम खरात, कोषाध्यक्ष किशोर थोरात, उपाध्यक्ष प्रकाश निकाळजे, अरुण बोर्डे, प्रा.सुनील मगरे, माजी नगरसेवक चेतन कांबळे, आनंद तांदूळवाडीकर, कमलेश चांदणे, डॉ .कुणाल खरात, विशाल दाभाडे, सचिन शिंदे, सागर कर्डक, सूरज पाखरे, कुणाल मराठे, आनंद लोखंडे, पप्पू दोंदे, रोहित सोळसे सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, जगात कोणीही बदलू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. शिक्षणात प्रत्येकाला संधी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीत छावणी मध्ये असलेला बंगला नंबर ९ चा प्रलंबित प्रश्न लवकरच मी मार्गी लावेल. असे आश्वासन यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले.
नवनर्वाचित अध्यक्ष राम भाऊ पेरकर म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची १३३ वी जयंती यंदा समाजाभिमुख विविध उपक्रमांनी येत्या १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम उत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरातील भीमजयंतीचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी अविस्मरणीय ठरणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रांती चौक तसेच भडकल गेट येथे साजरा करण्यात येणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जिल्हा जयंती महोत्सव समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ पेरकर यांनी स्पष्ट केले.