किशोर खिल्लारे यांची भाजपा कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र सदस्यपदी निवड

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२८
छत्रपती संभाजी नगर | भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी छत्रपती संभाजी नगरातील युवा कार्यकर्ते किशोर खिल्लारे यांची पुणे येथे भाजपा पदाधिकारी कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सदस्य कामगार मोर्चा पदी निवड करण्यात आली. सदरील निवडीचे नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील, मूरलिधर मोहोळ, महामंत्री विक्रम पाटील, कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, यांनी गोरगरीब संघटतीत, असंघटितीत कामगार वर्गाना न्याय मिळवून देण्याचे आवाहन करत महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड करून शुभेच्छा दिल्या. केंद्रीय अर्थ व वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, विजय औताडे कामगार मोर्चा चे प्रदेश सचिव व मराठवाडा प्रभारी प्रदीप पाटील, माजी महापौर बापू घडामोडे, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजू शिंदे, प्रदेश चिटणीस किरण पाटील, यांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी काळात भाजप कामगार मोर्चा च्या माध्यमांतून विविध घटकांना संघटीत करून मजबूत करण्याचे आश्वासन यावेळी किशोर खिल्लारे यांनी दिले.