इन्फीनाईट आर्ट्स डान्स अकॅडमी तर्फे दहा दिवसीय गरबा दांडिया प्रशिक्षण शिबीर एमजीएम मध्ये होणार बुधवारपासून प्रारंभ ; तरुणाई ने सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३
छत्रपती संभाजी नगर | नवरात्र उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून यंदा मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी रास दांडिया चा गरबा रंगणार आहे. दांडिया खेळण्याची तरुणाई मध्ये मोठी क्रेज असल्याने उत्तम प्रशिक्षण घेऊन दांडिया खेळण्यासाठी इन्फीनाईट आर्ट्स डान्स अकॅडमी तर्फे ४ ते १३ ऑक्टोबर दरम्यान दहा दिवसीय गरबा दांडिया प्रशिक्षण शिबीर सायंकाळी ५.३० वाजता, एमजीएम, क्लोवर डेल स्कूल, गेट क्रमांक ६ येथे बुधवार (दि.४) पासून सुरु होणार असल्याची माहिती अकादमी चे संचालक किरण पवार, विनोद चव्हाण यांनी दिली.
रास दांडिया खेळण्यासाठी उत्तम प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. दांडिया चांगल्या पद्धतीने खेळता आल्यास पाहणाऱ्या प्रत्येकाचे आपल्याकडे लक्ष वेधते. याबरोबरच चांगली पारंपारिक वेशभूषा केल्यास आपल्या भारतीय संस्कृतीचेही चांगले दर्शन घडते. त्यामुळे चांगल्या आणि अचूक प्रशिक्षण देण्यासाठी या महा शिबिराचे आयोजन केल्याचे किरण पवार, विनोद चव्हाण म्हणाले. हे शिबीर तीन ब्याच मध्ये होणार असून मर्यादित दांडिया प्रशिक्षणार्थीना यामध्ये आपला सहभाग नोंदविता येणार आहे. सायंकाळी ५.३०. ६.३० आणि ७.३० या वेळेत हे दांडिया प्रशिक्षण शिबीर होणार असून महिला व मुलींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व आपला सहभाग नोंदविण्यासाठी 7972144414, 9518916985 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.