मल्लांनी रंगवला जिल्हा गणेश महासंघाच्या कुस्तीचा आखाडा ; जगदीश राजपूत ठरला श्री गणेश महासंघ कुस्ती स्पर्धेचा मानकरी, अल्ताफ पटेल याला चारली धूळ

श्रीहरी पव्हेलियन येथे मल्लांच्या कुस्त्यांची लक्षवेधी दंगल ; आ. प्रदीप जैस्वाल, आ.संजय शिरसाट, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२५
छत्रपती संभाजीनगर | ऐकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा यावर्षी मल्लांनी लक्षवेधी ठरवला. श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आयोजित शहानूरमिया दर्गा येथील श्रीहरी पव्हेलियन येथे रविवारी (दि.२४) भव्य “कुस्ती” स्पर्धा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लहान मोठ्या कुस्ती पटुंच्या सहभागाने रंगली. जगदीश राजपूत हा मल्ल श्री गणेश महासंघ कुस्ती स्पर्धेचा यंदाचा मानकरी ठरला असून त्नेयाने अल्ताफ पटेल याला धूळ चारत आपला विजय मिळविला.
या कुस्त्यांच्या दंगलचे उद्घाटन आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत श्री हनुमान आणि छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले. यावेळी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष डी.एन. पाटील, किशोर तुळशीबागवाले, संजय फत्तेलष्कर, राजू नरवडे, कार्याध्यक्ष सुमित खांबेकर, राजेंद्र दाते, विशाल दाभाडे, अनिकेत निल्लावार, अनिकेत पवार, विशाल काकडे, शेखर जाधव, विजय चौधरी, धीरज सिद्ध, चेतन जांगडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती. पलक वर्मा या मल्ल मुलींनेही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मल्ल प्रतिस्पर्ध्याला चितपट केले. कुस्ती स्पर्धेच्या पुर्वीच पावसाने काही काळ दमदार हजेरी लावल्याने कुस्तीपटूंचा आनंद द्विगुणीत होत या दंगलीला उत्साहात सुरुवात झाली. वीस रुपयांपासुन तर पाच हजार रुपायांपर्यंत कुस्ती पटुंची दंगल यावेळी रंगल्याने शहरातील खेळाडुंनी या कुस्त्यांच्या दंगलीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून शरद कचरे, उस्ताद हंसराज डोंगरे, भगवान चित्रक, रामेश्वर विधाते, के. डी. चोपडे, मुक्तार पटेल, प्रा सोमीनाथ बाळे, प्रा हरिदास म्हस्के, नवनाथ औताडे, शेख अजीज, अर्जुन औताडे, इद्रिश शेख, बाबासाहेब थोरात, गोपाल बमनावर मंगेश डोंगरे, नितीश काबलीये, अक्षय वाघ यांनी काम पाहिले.