आर बी युवा मंचच्या वतीने यंदा कॅनॉटमध्ये दहीहंडीचा थरार ; परंपरा, संस्कृती जोपासणारा लक्षवेधी महोत्सव

सर्वोच्च गोविंदा पथकाची सलामी ठरणार रु.५१,०००/- च्या रोख बक्षिसाचे मानकरी ; भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यांची प्रमुख उपस्थिती
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६
छत्रपती संभाजीनगर | प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी कॅनॉट प्लेस येथे आर बी युवा मंच च्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजेपासून मान्यवरांच्या उपस्तीतीत हा दहीहंडी महोत्सव रंगणार आहे. आर बी दहीहंडी महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून गेल्या १४ वर्षापासून शहरातील गोविंदा पथक या महोत्सवात मोठ्या संखेने सहभागी होत असतात. या दहीहंडी महोत्सवातून सामाजिक भावना जपत महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडणार असून या दहीहंडी महोत्सवाला भामला फाउंडेशन चे अध्यक्ष आसिफ भामला यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आर बी युवा मंच चे अध्यक्ष राहुल बोरोले यांनी दिली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी उपमहापोर प्रमोद राठोड, प्रशांत सुरगनिवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आर बी दहीहंडी महोत्सवाचे आयोजक राहुल बोरोले यांनी सांगितले.आर बी दहीहंडी महोत्सवात यंदा महिला व लहान मुलांसाठी खास बसण्याची व्यवस्था तसेच पोलीस बंदोबस्तात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या दहीहंडी महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने बाळू गायकवाड, अविनाश पवार, मनोज लोखंडे पाटील, सौरव तोतरे यांनी केले आहे.