उत्तर प्रदेशातील देवबंद मध्ये भीम आर्मी चे चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर गोळीबार ; हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२८ 

सहारनपूर, उत्तर प्रदेश | भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूरच्या देवबंद परिसरात बुधवारी (दि.२८) दुपारी भ्याड हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी एक गोळी त्यांच्या शरीराला स्पर्श करून गेली. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले ते सुखरूप असून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र ज्यांनी हा हल्ला केला त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करून तातडीने अटक करावी आणि केंद्र शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी देशभरातील त्यांच्या समर्थकांनी केली आहे.

हरियाणाची पासिंग असलेल्या क्रमाकांच्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी चार गोळ्यांची फायरिंग केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या हल्ल्यात रावण यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून गोळी स्पर्शून गेल्याने सुदैवाने ते या हल्यातून बचावले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

 

हल्लेखोरांना तातडीने अटक करून आझाद यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी…

संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी दुखः कारक घटना आहे याचा सर्वात आधी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूरच्या देवबंद परिसरात भ्याड हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या शरीराला स्पर्श करून गेली. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले ते सुखरूप असून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र ज्यांनी हा हल्ला केला त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करून तातडीने अटक करावी आणि केंद्र शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मी करतो. महामहीम राष्ट्रपती यांनाही विनंती करतो कि या घटनेची तातडीने व गांभीर्याने दखल घ्यावी.

प्राचार्य सुनील वाकेकर, प्रदेशाध्यक्ष, आझाद समाज पार्टी, महाराष्ट्र राज्य.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!