शहरात १ जुन ते ७ जुन दरम्यान गुंजनार श्री शिवाय नमोस्त्युभ्य चा जयघोष ; पंडीत प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या भव्य कथेचे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या वतिने आयोजन

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१९
छत्रपती संभाजीनगर | शहरात श्री शिवाय नमोस्त्युभ्य चा जयघोष गुंजणार असून पंडीत प्रदिपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या भव्य कथेचे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या वतिने आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमच शिव महापुराण ऐकण्याची मोठी संधी शहरातील शिव भक्तांना मिळणार आहे. येत्या १ जुन ते ७ जुनपर्यंत दुपारी २ ते ५ यावेळेत पिसादेवी रोडवरील श्री रामचंद्रमठ बालाजी मठ ट्रस्टची गट नं. १२४, १२५ येथील ५० हजार जागेवर कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार जैस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आमदार जैस्वाल म्हणाले की, पंडीत प्रदिपजी मिश्रा सिहोरवाले यांची मोठी लोकप्रियता आहे. तसेच त्यांचा भक्त परीवरही खुप मोठा आहे. शिव महापुरान या कथेसाठी वाट शिवभक्तांना वाट पाहावी लागते. मात्र आपल्याकडे लवकर ही कथा मिळालेली असुन मोठया तयारीनिशी अन् भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आयोजित केली आहे. पंडीत मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत साधारणत: दहा ते पंधरा लाख भाविक येतात. हा अंदाज घेऊन पहिल्यांदाच शहरात या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ४० बाय ८० फुटाचे स्टेज, ४ लाख स्क्वेअर फुटाचा मंडप, ६० हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रुफ मंडप, ३० मोठे स्क्रीन राहतील. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान, जाधववाडी येथील मोकळे मैदान, गरवारे कंपनीचे मोकळे मैदान, हर्सूल जेल समोरील मैदान, पिसादेवी चौफुली मैदान, टि.व्ही. सेंटर येथील मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. भाविकांना बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन येथून ३० बसेस, १० हजार सेवेकरी राहतील. एमएसईबी लाईटसह १५ जनरेटरची सुविधा, नागपुरवरून खास १०० ते २०० फिरते शौचालय मागविण्यात आले आहे. तसेच डॉक्टर, मेडिकल, अग्निशमन दलाची गाडी, बाहेरील भाविकांसाठी राहण्याची सुविधा केली जाणार असल्याचे आमदार जैस्वाल म्हणाले. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत दयाराम बसैये, विश्वनाथ राजपुत, मदन जैस्वाल, भावेश सराफ आदींची उपस्थिती होती.