पँथर्स आर्मीचा द्वितीय वर्धापन दिन उत्सहात ; पँथर नेते मनोज भाई संसारे यांना श्रद्धांजली

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १७
छत्रपती संभाजीनगर | पँथर्स आर्मी सामाजिक संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सुभेदारी विश्राम गृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात रविवारी (दि.१४) साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज, व वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून पँथर नेते मनोज भाई संसारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
द्वितीय वर्धापन दिन निमित्त आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.अनिल गवळी, सुरज भाई खाजेकर यांची उपस्थिती होती. यावेळी महिला महाराष्ट्र अध्यक्षा कामिनी रगडे यांनी प्रास्ताविक केले. पँथर्स आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांच्या सोबत आपण काम करून त्यांचे हात बळकट करावे व त्यांनी आजवर जेही कार्य केले ते इतरांच्या उज्वल भविष्यासाठीच केले. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे मनोगत राष्ट्रीय उपाध्यक्ष विधिज्ञ संघपाल इंगळे प्रा. अनिल गवळे, सुरज भाई खाजेकर यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केले. पुढेही ते महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करतील असेही ते म्हणाले. कवितेच्या माध्यमातून पँथर्स आर्मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या कामातून गोरगरीब जनतेची सेवा घडावी व आपण मोठे यशस्वी व्हावं असे मत श्री.सावंत व श्री. बोरुडे यांनी मांडले. पँथर्स आर्मी हे एक संघटन नसून हा एक परिवार आहे आणी मी जरी संस्थापक अध्यक्ष असलो तरी मी एक तुमच्यातला सर्वसाधारण असलेला एक सदस्य समजतो. तुम्ही माझ्या साठी काम न करता तुम्ही एका परिवारा साठी काम करा आणि परिवाराची धुरा तुमच्याच हाती आहे. बाकी तुमच्या वर आहे की तुम्ही तुमचा परिवार कसा सांभाळता. दोन वर्षात पँथर्स आर्मी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पसरलेली आहे. २० वर्षात महाराष्ट्रात पँथर्स आर्मी शिवाय कोणीच नसणार असे आवाहन पँथर्स आर्मीचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांनी केले. भूषण नवगिरे यांना युवा मराठवाडा अध्यक्ष, अमोल कांबळे यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत हिवराळे यांना भावसिंगपुरा शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र संघटक अमोल निक्कम, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष भगवान एडके, ठाणे जिल्हा अध्यक्ष विशाल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मोसीन शहा, गंगापूर तालुका उपाध्यक्ष मुजीब शेख, युवा मराठवाडा कार्याध्यक्ष देवा भालेराव, जालना जिल्हा युवा अध्यक्ष संदीप लहाने, अंबड तालुका उपाध्यक्ष कार्तिक बोराडे, महिला मराठवाडा अध्यक्षा काजल गेहलोत, औरंगाबाद महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनी बोरगे, शाखा अध्यक्षा घोरपडे ताई, निकाळजे साहेब, पत्रकार विकास भाई व इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.