इंडियन ऑईलकडून महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा ; छत्रपती संभाजीनगर येथे एक्स्ट्राग्रीन डिझेल ची विक्री रिटेल आऊटलेट मध्ये सुरू

 लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २५   

· पुढील ३-४ वर्षांत महाराष्ट्रात सुमारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
·  इंडियन ऑइलकडून महाराष्ट्रात विविध सुविधांच्या विकासासाठी २३२६ कोटीं रुपयांचा खर्च होणार 

छत्रपती संभाजीनगर  | इंडियन ऑइलने आज औरंगाबाद येथील रिटेल आउटलेटमध्ये
एक्सट्राग्रीन डिझेल विक्रीचे औपचारिक उद्घाटन इंडियन ऑईलच्या महाराष्ट्र व गोवा राज्य कार्यालयाचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक श्री. अनिर्बन घोष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या उपक्रमांची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या वेळी  श्री अनूप सामंतरे, सीजीएम (एलपीजी), श्री. संजय सेमवाल, जीएम (रिटेल सेल्स), श्री. राकेशकुमार सरोज, डिव्हिजनल रिटेल सेल्स हेड, औरंगाबाद, आणि श्री. चेतन पटवारी, डिव्हिजनल एलपीजी सेल्स हेड, औरंगाबाद उपस्थित होते. 
इंडियन ऑईलने २०२२ हे वर्ष क्राफ्टिंग अ ग्रीन फ्युचर चे (हरित भविष्याची जडणघडण) वर्ष म्हणून साजरे केले आणि २०२३ हे वर्ष;हरित संकल्प बळकट करण्यासाठी समर्पित असणार आहे.

स्वच्छ आणि हरित भविष्यावर केंद्रित असणाऱ्या कॉर्पोरेशनच्या काही उपक्रमांमध्ये रिटेल आऊटलेट्स, पुरवठा केंद्रे आणि इंडियन ऑईल ऑफिस इमारतींचे सोलारायझेशन, वेगवेगळे ब्रँडेड इंधन/वंगण आणि पर्यायी इंधन इत्यादी सादर करणे यांचा समावेश आहे. हा लक्षणीय प्रवास असाच सुरू ठेवत, इंडियन ऑईलने आज दक्षता पेट्रोल पंप, औरंगाबाद या त्यांच्या रिटेल आउटलेटवर एक्स्ट्राग्रीन (Xtragreen) डिझेल सादर केले. एक्स्ट्राग्रीन डिझेल हे नवीन काळातील उच्च कार्यक्षमता असलेले डिझेल असून ते इन-हाउस तंत्रज्ञानाद्वारे विकसित केले आहे. एक्स्ट्राग्रीनमुळे इंधनाची कार्यक्षमता ५ ते ६ टक्के ने वाढते. यात गंजापासून उत्कृष्ट संरक्षण लाभते. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन, कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होत असल्यामुळे त्याचे स्वरूप खरोखरच हरित आहे. आजच्या नवीन आरओची भर पडल्याने, एक्स्ट्राग्रीन हे महाराष्ट्रातील ३७६ आउटलेटवर उपलब्ध होणार आहे. त्यांपैकी २१ आउटलेट औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. नजीकच्या काळात औरंगाबादमध्ये आम्ही आणखी ४ आऊटलेट्सवर एक्स्ट्राग्रीन उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. सध्या, इंडियन ऑईलचा महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल रिटेल विक्रीत २८.५ टक्के एवढा वाटा असून डिझेल रिटेल विक्री मध्ये ३२. ६ टक्के आणि उद्योग आधारावर आरओ  नेटवर्कमध्ये ३२ टक्के वाटा आहे. इंडियन ऑईलचे एकूण २५२५ रिटेल आउटलेट्स आणि ६२२ एलपीजी वितरकांचे नेटवर्क आहे. त्यामुळे राज्याला पीओएल पुरवठा नेहमी अखंडित राहण्याची हमी मिळते. महाराष्ट्राच्या तिजोरीत कंपनीने गेल्या आर्थिक (२०२१-२२) वर्षात ८७९४ कोटी रुपयांची (वॅट, सीएसटी आणि एसजीएसटी) भर घातली. चालू वर्षातही एप्रिल-डिसेंबर २०२२ दरम्यान, इंडियन ऑईलने महाराष्ट्राच्या तिजोरीत ७२२४ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. इंडियन ऑईलच्या महाराष्ट्र व गोवा राज्य कार्यालयाचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक श्री. अनिर्बन घोष यांनी औरंगाबाद येथे आज माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील इंडियन ऑईलच्या प्रसाराची माहिती देताना श्री. घोष म्हणाले, की “इंडियन ऑईल्स मनमाड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, वाशी, वडाळा, शिवरी एक आणि दोन , जेएनपीटी, अकोला, मिरज, धुळे, चंद्रपूर येथे असलेल्या आपल्या १३ तेल केंद्रामार्फत महाराष्ट्राच्या इंधनाची गरज भागवते. तसेच मनमाड, पुणे, नागपूर आणि वाशीम येथे असलेल्या ४ बॉटलिंग प्लांटद्वारे एलपीजीची गरज पूर्ण करते. याशिवाय इंडियन ऑइलचे मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कुलाबा, जुहू, शिर्डी आणि सिंधुदुर्ग येथे ९ विमान इंधन केंद्रे आहेत.” ते पुढे म्हणाले, “पुरवठा केंद्र, विमान इंधन केंद्रे आणि नवीन रिटेल आउटलेट्सचा विकास/अपग्रेड इत्यादींसाठी पुढील ३-४ वर्षांत महाराष्ट्रात सुमारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन ऑईलची योजना आहे.

इंडियन ऑईल सध्या ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत एक्स्ट्रारिवॉर्ड्स (Xtrarewards) प्रचार मोहीम राबवत असून यामध्ये खालील फायदे आहेत –
·  नवीन नावनोंदणीसाठी ५० रुपये एवढे अतिरिक्त रिवॉर्ड पॉइंट्स
·  एक्सपी९५ आणि एक्स्ट्राग्रीनसाठी प्रति १०० रुपयांमागे १. ६० रुपये एवढे रिवॉर्ड पॉइंट.
·  नियमित पेट्रोल/डिझेलसाठी प्रति १०० रुपयांमागे ०.८० एवढे रिवॉर्ड पॉइंट.
·  एक्सपी१०० साठी प्रति १०० रुपयांमागे ४.० एवढे रिवॉर्ड पॉइंट.
·  सर्वसाधारणपणे, एक्स्ट्रारिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये इंधन खरेदीसाठी प्रति १०० रुपयांमागे ०.४० रुपये एवढे रिवॉर्ड पॉइंट्स असतात.

महत्त्वाचे प्रकल्प :
कोयाली-मनमाड- सोलापूर- अहमदनगर पाईपलाइन: बडोद्यातील कोयाली रिफायनरीपासून ७४७ किमी लांबीची उत्पादन पाईपलाइन टाकणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. ती गुजरात (४ जिल्ह्य़ांमध्ये २०२ किमी) आणि महाराष्ट्र (८ जिल्ह्य़ातील ५४५ किमी)अशा १२ जिल्ह्यांमधून जाते. दुमाड, सोनगढ आणि मनमाड येथे पंपिंग केंद्र असून मनमाड, अहमदनगर आणि सोलापूर येथे वितरण केंद्रे असतील. मनमाड टर्मिनल, सोलापूर टर्मिनल आणि अहमदनगर डेपो येथे मोठ्या प्रमाणावर अपग्रेडची कामे सुरू आहेत. यात स्टोरेज आणि ऑपरेशनल क्षमता वाढविण्यावर भर असेल. या केंद्रांच्या विकासासाठी इंडियन ऑईल महाराष्ट्रात  २३२६ कोटी रुपये खर्च करत आहे.  महाराष्ट्रातील नागपूर येथे एलपीजी बॉटलिंग प्लांट इंडियन ऑईलने ऑगस्ट २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे ६० टीएमटीपीए क्षमतेचा एलपीजी बॉटलिंग प्लांट सुरू केला आहे. त्याचा खर्च १४० कोटी रुपये आहे.
हरित भविष्याची जडणघडण इंडियन ऑईलने २०२२ हे वर्ष क्राफ्टिंग अ ग्रीन फ्युचरचे (हरित भविष्याची जडणघडण) वर्ष म्हणून साजरे केले आणि २०२३ हे वर्ष हरित संकल्प बळकट करण्यासाठी समर्पित असणार आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यावर केंद्रित असणाऱ्या कॉर्पोरेशनच्या काही उपक्रमांमध्ये रिटेल आऊटलेट्स, पुरवठा केंद्रे आणि इंडियन ऑईल ऑफिस इमारतींचे सोलारायझेशन, वेगवेगळे ब्रँडेड इंधन/वंगण आणि पर्यायी इंधन इत्यादी सादर करणे यांचा समावेश आहे. हा लक्षणीय प्रवास असाच सुरू ठेवत, इंडियन ऑईलने आज दक्षता  पेट्रोल पंप, औरंगाबाद या आमच्या रिटेल आउटलेट येथे एक्स्ट्राग्रीन (Xtragreen) डिझेल सादर केले आहे.

हरित उपक्रमांचा सारांश खालीलप्रमाणे आहे –
एक्स्ट्राग्रीन डिझेल: एक्स्ट्राग्रीन डिझेल हे नवीन काळातील उच्च कार्यक्षमता असलेले डिझेल आहे जे इन- हाउस तंत्रज्ञानाद्वारे विकसित केले आहे. एक्स्ट्राग्रीन इंधनाची अर्थव्यवस्था ५ ते ६ टक्के वाढवते. यात उत्कृष्ट गंज संरक्षण आहे. हे खरोखरच हिरवेगार आहे कारण ते कार्डन डायऑक्साइड उत्सर्जन, कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जन आणि NOx उत्सर्जन कमी करते. आजच्या नवीन आरओ च्या जोडणीसह, एक्स्ट्राग्रीन महाराष्ट्रातील ३७६ आउटलेटवर उपलब्ध आहे, त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील २१ आउटलेट आहेत. नजीकच्या काळात औरंगाबादमध्ये आणखी ४ आऊटलेट्सवर आम्ही  एक्स्ट्राग्रीन जोडू.

एक्सपी ९५ – इंडियन ऑईलने एक्सपी ९५ या ब्रँड नावाखाली अत्यंत कार्यक्षम आणि प्रगत असे  पेट्रोल सादर केले असून हे ९५ ऑक्टेन पेट्रोल आहे,. ते इंधनाची कार्यक्षमता ३.९५ टक्के ने वाढवून अधिक शक्ती, अधिक गती आणि अधिक माईलेज देते. इंडियन ऑईलने महाराष्ट्रात ७३४ आरओमध्ये एक्सपी९५ उपलब्ध करून दिले असून त्यांपैकी ४२ औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. नजीकच्या भविष्यात औरंगाबादमध्ये आणखी एका रिटेल आउटलेटमध्ये एक्सपी९५ उपलब्ध करून देण्याची इंडियन ऑईलची योजना आहे. एक्सपी१०० – इंडियन ऑईल ही भारतात १०० ऑक्टेन सुपर प्रीमियम पेट्रोल सादर करणारी पहिली कंपनी आहे. हे हाय एंड प्रिमियम कारसाठी योग्य इंधन असून ते जलद अॅक्सीलरेशन, सहज ड्रायव्हिंग, कमी इंजिन डिपॉझिट आणि लक्षणीयरीत्या कमी उत्सर्जन देते. इंडियन ऑईलने महाराष्ट्र राज्यातील १४ आरओ मध्ये एक्सपी१०० उपलब्ध करून दिले असून त्यांपैकी एक औरंगाबाद शहरातील लोळगे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स येथे आहे. सर्व्हो लुब्रिकंट्स : सर्व्हो या आमच्या लुब्रिकंट्सच्या सुपरब्रँडने ५० वर्षे पूर्ण केली आहेत. हा भारतातील सर्वात मोठा लूब्रिकंट ब्रँड असून तयार ल्युब्स वर्गातील बाजारपेठेत त्याचा वाटा २७ टक्के पेक्षा जास्त आहे. सर्व्होमध्ये १७०० पेक्षा जास्त सक्रिय एसकेयूमध्ये १६०० ग्रेडचे लुब्रिकंट्स उपलब्ध असून ते देशात ची विक्री करतात.

सर्व्हो ब्रँड अंतर्गत राबविण्यात आलेले काही उल्लेखनीय हरित उपक्रम खालीलप्रमाणे
1. इंधन कार्यक्षम असलेले एकूण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन १० टक्के नी कमी करण्यात मदत करणारे ग्रीन लुब्रिकंट्स. ग्रीन इंजिन ऑईल उत्पादने ही पॅसेंजर कार (सर्वो ग्रीनमाईल), हेवी डिझेल इंजिन (सर्वो राफ्तार) आणि टु – व्हीलर (सर्व्हो ४टी ग्रीन) सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहेत.
2. इंजिन ऑइल, गियर ऑइल आणि एक्सल ऑइल यांचे मिश्रण असलेले ग्रीन कॉम्बो ल्युब्रिकंट.ते कमी उत्सर्जनासोबतच इंधनाची कार्यक्षमता ५.५ टक्के नी वाढवू शकतात आणि मुख्यतः फ्लीट ऑपरेटर आणि राज्य परिवहन युनिट्स यासाठी आहेत. इंडेन एक्स्ट्रातेज (Indane Xtratej) : इंडियन ऑईलने व्यावसायिक वापरासाठी इंडेन एक्स्ट्रातेजचे
मार्केटिंग सुरू केले आहे. फ्लेम टेंपरेचरमध्ये किमान ६५ डिग्री सेल्सियसने वाढ, एलपीजीच्या वापरामध्ये किमान ५ टक्के बचत आणि स्वयंपाकाच्या वेळेत किमान १४ टक्के बचत यांचा याच्या फायद्यांमध्ये समावेश आहे.
इंडेन नॅनोकट ( Indane Nanocut)  : इंडेन नॅनोकट हे अॅडिटाइज्ड एलपीजी असून ते सामान्य एलपीजीपेक्षा जास्त फ्लेम टेंपरेचर म्हणजे सुमारे २३०० डिग्री सेल्सिअस देते. ते जास्त जाडीचे स्टील शीट कापण्यासाठी योग्य ठरते. सध्याच्या ऑक्सि-अॅसिटिलीन कटिंग प्रक्रियेपेक्षा सुमारे ७५ टक्के स्वस्त असून सुरक्षित पर्याय आहे.

कंपोझिट एलपीजी सिलिंडर : इंडियन ऑईलने कंपोझिट एलपीजी सिलिंडर लाँच केले असून त्यात ब्लो- मोल्डेड पीईटी/मेटलिक इनर लाइनरने बनलेले तीन थरांची रचना आहे. त्यावर पॉलिमर-रॅप्ड फायबर ग्लासच्या संमिश्र थराचे आवरण असून त्यावर एचडीपीईचे आऊटर जाकीट आहे. पारंपारिक सिलेंडरपेक्षा हे ५० टक्के हलके असून ग्राहक यातील एलपीजीची पातळी पाहू शकतात. स्टीलच्या सिलिंडरपेक्षा ते जास्त सुरक्षित असून ते ५ किलो आणि १० किलोच्या सिलिंडरमध्ये उपलब्ध आहे.छोटू : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने किराणा स्टोअर्स/सुपरमार्केटमधून “छोटू” या नावाने ओळखल्या जाणारे ५ किलोचे एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा पायंडा पाडला. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी कोपऱ्यावरील दुकानांतून एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रारूपाचे अनुकरण करणारी ती देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली. यासाठी केवळ ओळखीचा पुराव्याची आवश्यकता असते आणि पत्त्याच्या पुराव्याची आवश्यकता नसते.  ग्राहक स्वतःच्या सोयीनुसार कोणत्याही शहरात एफटीएल सिलिंडर वापरू शकतात.पीओएस मधून सिलिंडर खरेदी केले असल्यास, सिलेंडर वापराचा काळ कितीही असला तरी ५०० रुपये एवढ्या निश्चित रकमेसह परतावा मिळण्याचा पर्याय ग्राहकांना मिळतो.

सोलरायझेशन : इंडियन ऑईलने महाराष्ट्रात १२१५ रिटेल आउटलेटचे सोलरायझेशन केले असून  सर्व रिटेल आउटलेट्सचे लवकरच सोलरायझेशन करण्यात येणार आहे. मनमाड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, वाशी, जेएनपीटी, अकोला, मिरज, धुळे, चंद्रपूर आणि मनमाड, पुणे, नागपूर आणि वाशीम येथील एलपीजी बॉटलिंग प्लांट्स येथे आम्ही सोलर पीव्ही प्लांट्स बसवण्याची योजना आखली आहे.

सीएनजी : महाराष्ट्रातील आमच्या १४२ रिटेल आउटलेटवर सीएनजी सुविधा उपलब्ध असून आम्ही मार्च २०२३ पर्यंत सीएनजी सुविधेसह आणखी १८ आरओ जोडण्याचा विचार करत आहोत. आमच्या सध्याच्या रिटेल आउटलेटवर सीएनजी स्टेशन सुरू करण्यात जात आहेत.  ईव्ही चार्जिंग स्टेशन्स : इंडियन ऑईलने स्वतःच्या रिटेल आउटलेट्सवर ३०० ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू केले असून मार्च २०२३ पर्यंत आणखी १८० नियोजित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ईव्ही चार्जिंगची सुविधा १५ आउटलेटवर उपलब्ध आहे आणि त्यात लवकरच आणखी ९ जोडली जातील. एक्स्ट्रारिवॉर्ड्स (XTRAREWARDS) : ही इंडियन ऑइलची लॉयल्टी योजना असून तीमध्ये एक कोटींहून अधिक ग्राहक सहभागी आहेत. पेट्रोल/डिझेल, IndianOil One App, Paytm, PhonePe, GPay इत्यादींद्वारे खरेदी करताना ITPS लिंकच्या माध्यमातून यासाठी नावनोंदणी करता येते. नोंदणीसाठी खालील ऑनलाइन लिंक देखील वापरता येऊ शकेल –

https://cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_xtrarewards

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!