मनसे प्रमुख राज ठाकरे परळीत दाखल ; २००८ च्या बस तोडफोड प्रकरणी कोर्टात सुनावणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १८     

बीड | छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे परळी कोर्ट मध्ये हजर होण्यासाठी छत्रपती संभाजी नगर मध्ये हेलिकॉप्टर ने दाखल होऊन रस्ते मार्गाने पळशी गावातून ते परळीला दाखल होणार आहे. सकाळी ११ वाजता ते परळी कोर्टा मध्ये हजर होणार आहेत. २००८ च्या बस तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, त्या प्रकरणीच्या सुनावणीसाठी ते परळी कोर्टात हजर राहतील.

अतिशय गुप्तपणे राज ठाकरे यांचा दौरा ठेवण्यात आला होता. या आधी दोन वेळा राज ठाकरे यांना अटक वारंट जारी करण्यात आला होता. अतिशय मोजकेच पदाधिकारी या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांच्या सोबत होते. बीड मध्ये ते हेलीकॉप्टर ने आज सकाळीच दाखल झाले होते. यासाठी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यानी ५० फुटी भव्य हार त्यांच्या स्वागतासाठी तयार केला होता. परळी कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ते हेलिकॉप्टर ने पुन्हा छत्रपती संभाजी नगर मधील पळशी गावातून मुंबईकडे रवाना होतील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!