महाॲडव्हाटेज एक्स्पोच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे या एक्स्पो चे उद्घाटन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २

छत्रपती संभाजीनगर | शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित   ‘महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोला’ जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली. उद्या ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे या एक्स्पो चे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य अशा व्यासपीठ आणि आसन व्यवस्थेची तसेच कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी हॉलची पाहणी करून जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधित आयोजकांना केल्या.

पाहणी केल्यानंतर प्रदर्शनाचे अतिशय काटेकोर नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक देखील केले .  यावेळी पाण्डेय यांनी ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी,मसिहाचे अध्यक्ष किरण जगताप आदीसोबत प्रदर्शनातील इलेक्ट्रॉनिक ट्रांसफार्मर, सूर्या लाईट, मॅजिक इंडस्ट्रीज, प्री इंजीनियरिंग बिल्डिंग, काँक्रेट रोड कटिंग मशीन आदीसह विविध स्टॉलची पाहणी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!