फ्री पास मागणार्‍या फुकट्यांना डॉ.अमोल कोल्हे यांची चपराक ; तिकीट खरेदी करूनच महानाटय़ाला येण्याचे पोट तिडकीने आवाहन

सचिन एस. अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | दि. २८  : गेल्या सात दिवसापासून शिवपुत्र संभाजी महानाटय़ाचे प्रयोग छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे. स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींचा धगधगत्या इतिहासाला पाहण्यासाठी शिवशंभू भक्तांची मोठी गर्दी होत असून मंगळवारी (दि.२७) पूर्व संधेला महानाटय़ाच्या उत्तरार्धात स्वतः छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आहे त्याच महाराजांच्या वेशभूषेत माईक घेतला. महानाटय़ाचे फ्री पासेस मागणार्‍या आणि प्रयोगाला येऊन बसलेल्यांना चांगलीच चपराक त्यांनी यावेळी आपल्या सडेतोड बोलण्यातून दिली. तिकीट खरेदी करून आलेल्या प्रेक्षकांची माफी मागत त्यांनी विना तिकीट आलेल्यांचा खरपूस समाचार घेतला व अर्ध्यावर झालेल्या प्रयोगातून तिकीट खरेदी करण्याचे पोटतिडकीने आवाहन केले.

काय म्हणाले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे … वाचा सविस्तर…

दीडशेहून अधिक कलाकार अनवाणी पायाने शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सादर करत असल्याची जाणीव करून देत अभिनेते डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, आम्हाला अनेक जन आवर्जून विचारतात, या महानाट्याचे फ्री पासेस कुठे मिळतील… या महानाट्याचे आम्हाला पासेस हवेत… आणि मी अगदी शेवटी, जे तिकीट काढलंय… पुढही जे तिकीट काढून आले… या प्रत्येक पालकांचे आभार मानतो, जे तिकीट काढून या महानाट्याला आलेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून कौतुक करतो. कारण हॉटेलला गेल्यानंतर जेवणाचे बिल असेल, पिझा ऑर्डर केल्यानंतर, पिझाचे बिल असेल, तिथे आपण फ्री मागत नाही, आणि आपल्या धाकल्या धन्याचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघण्यासाठी, केवळ आपण कुणीतरी अधिकारी आहोत… केवळ आपण कुणीतरी इंफ्लोयीन्शल आहोत…केवळ आपली कुणाची तरी ओळख आहे… म्हणून माझी विनंती आहे, हात जोडून… कृपया फ्री पासेस मागू नका. आणि आज या प्रेक्षागृहात अनेक जन विदाऊट तिकीट आलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी तिकीट काढले त्यांची मी हात जोडून माफी मागतो. पण महाराजांची शिकवण आहे. कि तेलाच्या वेशाने जर उंदराने वाती पळवल्या ना तर गवताच्या गंज्या पेटतात. त्यामुळे आपण सगळेजण मला सहकार्य करा. आपापल तिकीट हे कृपया दाखवा… आमची टीम येऊन तिकीट चेक करेल. ज्यांनी तिकीट काढले नाही, मी जाहीरपणे त्यांना काही म्हणू इच्छित नाही. पण बाहेर तिकिटाचा स्टोल सुरु आहे. आपण अर्धा प्रयोग पाहिलेला आहे. कृपया आपण जाऊन बाहेरून तिकीट काढले तरी चालेल. कारण जे स्पोंसरर्स आहेत. हे स्पेशल पासेस आमच्या स्पोंसरर्स साठी अशासाठी आहेत. कि मुघले आजम सारखं नाटक होतं, इनडोअर नाटक होतं… ज्याला ८०००, ५००० आणि ३००० रुपये तिकीट असत. आम्ही विचार करतो कि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला, आपल्या लेकरांना हे नाटक दाखवता आले पाहिजे. म्हणून अवघ्या ३०० रुपये, ५०० रुपये, हजार रुपये आणि दीड हजार रूपये हे तिकीट आपण काढतोय… आणि हे आपल्या प्रयोजाकांमुळे शक्य झालंय म्हणून मी प्रायोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. त्यामुळे जे पासेस आहेत ते प्रायोजकांसाठी आहेत. आणि उद्याच्या आपल्या माध्यमातून हा निरोप जाउद्या, उद्याच्या प्रयोगाचा कोणताही पास शिल्लक नाही. जर कोणाला पास हवा असेल तर तो कृपया माझ्याकडे माघा… माझं जे काही नाटकाचं मानधन असेल ते वजा करून तुमची ऐपत नाही असे समजून मी तुम्हाला फ्री पास देईल. कारण माझ्या छत्रपतींचा इतिहास कोणी फुकट पाहावा… जर असे वाटत असेल तर मी हात जोडून विनंती करतो, आपण मान्यवर आहात… आपण जबाबदार पदांवर काम करतात… इथे जे काही होतं, या दीडशे कलाकारांच्या मेहनतीचा तो अपमान आहे. रक्ताचे पाणी करतोय… पाय सोलवटलेत… किती तरी ठिकाणी रक्त साकळलय… तरी सुद्धा आपल्या छत्रपतींचा इतिहास पोहोचवण्यासाठी करतोय आणि म्हणून हे पोट तिडकीने बोलतोय… जर स्वतःलाच हा प्रश्न विचारलात तर कोणी विचारणार नाही, उलट आपण इतके जबाबदार आहात… इतके मान्यवर आहात कि ज्यांना परवडत नाही अशा आणखी दहा लेकरांना आपण नाटक दाखवू शकता. आणि आपल्यासारख्या मान्यवर महनीय व्यक्ती जेव्हा आवर्जून विचारतात फ्री पास आहे का? वाईट वाटत नाही, पण कुठेतरी काळजाला लागतं…कि अगदी मुकेश अंबानी सारखे उद्योगपती मुगले आजम चे तिकीट रांगेत उभे राहून काढतात. आणि आमच्या छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी मात्र, आम्ही ओळखीचा, पदाचा वापर करून फोन करतो… फुकट पास मिळेल का? हि संस्कृती नाही… हा इतिहास नाही… माझी आपल्याला विनंती…. आणि कृपया आपली तिकिटे जी चेक होतील, त्यासाठी आपण सहकार्य करावे. ज्यांनी तिकीट न घेता जे आलेले असतील, माझी विनंती हे, हा सोहळा आहे… इतिहासाचा सोहळा आहे… धाकल्या धन्यांच्या इतिहासाचा सोहळा आहे… त्यांनी आवर्जून जाऊन तिकीट काउंटरवरून तिकीट काढावं… कारण जाहीरपणे कुणाला अपमानित करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. आणि ज्यांनी तिकीट काढलं या गैरसोयीबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण या सांदया-सपाट्या शोधाव्या लागतील. आपण सगळे सहकार्य कराल हि अपेक्षा… धन्यवाद..! जय शिवराय.!!!

स्वतः डॉ.अमोल कोल्हे करणार तिकीट विक्री…

मंगळवारच्या प्रयोगानंतर शेवटच्या प्रयोगाची तिकिटे विक्री करण्यासाठी स्वतः अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी (दि.२८) सकाळी ११ वाजता शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तिकिटे विक्री करण्यासाठी जबिंदा मैदानावरील तिकीट काउंटरवर बसून तिकिटे ते विक्री करणार आहेत. प्रथम येणाऱ्या प्रेक्षकांना ते स्वतःच्या हाताने तिकिटे देणार असून मराठी रंगभूमी तसेच स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची धगधगती अंगारगाथा सर्वसामान्य आणि तिकीट खरेदी करून महानाट्य पाहणाऱ्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांची थेट भेट ठरणार आहे. बुधवारी या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा शेवटचा प्रयोग छत्रपती संभाजी नगर मध्ये सायंकाळी ६ वाजता जबिंदा ग्राउंड वर होईल.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!