क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे ३६ वे राष्ट्रीय संमेलन  ; २७ ते ३० डिसेंबर दरम्यान एमजीएम विद्यापीठात आयोजन ; देशभरातून सुमारे २२०० उद्योग समूह सहभागी होणार 

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.  

छत्रपती संभाजीनगर | क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे (क्यूसीएफआयचे) ३६ वे राष्ट्रीय संमेलन दिनांक २७  ते ३० डिसेंबर रोजी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विशेष अतिथी बडवे ग्रुपच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, संजीव ऑटोच्या कार्यकारी संचालिका मैथिली तांबोळकर आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यंदाचे राष्ट्रीय संमेलन एकात्मिक गुणवत्ता विकास जागतिक नेतृत्वाचे प्रवेशद्वार” या संकल्पनेवर आधारित आहे. प्रथमच औरंगाबाद शहराला यजमान पदाचा मान प्राप्त झाला आहे. इस १९८२ सालापासून फोरम ऑफ इंडिया ही संस्था गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिली जातात. “नॉट फॉर प्रॉफिट “या तत्त्वावर आधारित या संस्थेचे काम सुरू आहे. देशभरात क्यूसीएफआयच्या २९ शाखा तसेच पाच उपशाखा कार्यरत आहेत. गुणवत्ता धोरणाचा विकास करण्यासाठी तसेच गुणवत्तेविषयी जागृती करण्यासाठी संस्था देशभरात या शाखा तसेच उपशाखांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. देशातील नामांकित उद्योग समूहांचे प्रतिनिधी या संस्थेत स्वयंप्रेरणेने कसलेही मानधन न स्वीकारता देशाच्या तसेच समाजाच्या विकासासाठी कार्यरत असतात. देश विदेशातील विविध उद्योग समूहात राबविला जाणाऱ्या गुणवत्ता विषयक संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्या माध्यमातून चांगल्या संकल्पनांचे आदान प्रदान करण्यासाठी क्यूसीएफ आय मार्फत प्रतिवर्षी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले जाते . यावर्षी हा मान औरंगाबाद शहराला मिळाला असून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सहयोगाने हे संमेलन संपन्न होणार आहे. तीन वर्षाच्या खंडानंतर हे संमेलन होणार असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या संमेलनात देशभरातून सुमारे २२०० उद्योग समूह आपल्या गुणवत्ता धोरणाविषयीचे प्रबंध सादर करणार आहेत. या संमेलनात सुमारे ११ हजारपेक्षा जास्त विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. टोटल कॉलिटी मॅनेजमेंट, फाईव्ह एस, कायझेन, सिक्स सिग्मा पोकायोके एसएमइडी अशा विविध विषयावर सादरीकरण होणार आहे. एमजीएम विद्यापीठात ६५ ठिकाणी समांतर असे एकाच वेळी हे प्रबंध सादर केले जातील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!