दुर्घटना झाल्यास हमी कोण घेणार ; मनसे चे अनिकेत निल्लावार यांचा सवाल

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१८
छत्रपती संभाजी नगर | औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर असलेल्या फटाक्यांच्या दुकानांना ऑक्टोबर २०१६ मध्ये भीषण आग लागली होती. शहराची मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणीच हि घटना घडल्याने पुन्हा मनपा प्रशासनाने टीव्ही सेंटर येथील मैदानावर फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देण्याचा उद्योग सुरु केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही महापालिका प्रसाशन आणि काही अधिकारी आपली खाबुगिरी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकाने थाटात नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा जर अशी दुर्घटना झाल्यास हमी कोणते अधिकारी घेणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
टीव्ही सेंटर येथील मोकळ्या मैदानावर रोज तळीरामांची मैफल रंगत असते. याकडे जिल्हा प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष दिसून येते. याच मैदानाचे विकास करण्याएवजी महापालिकेने विकास आराखड्याचा भंग करत ही मैदाने भाडेतत्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. टीव्ही सेंटर मैदानावर आनंद नागरी, तसेच इतर कार्यक्रम घेण्यासाठी भाडेतत्वावर देण्यावर भर दिला आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न महापालिका प्रशासन करत असून अनेक अधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरु असल्याची चर्चा आहे. परिणामी खेळासाठी तसेच खेळाडू घडविण्याएवजी हि मैदाने आता फटाक्यांच्या दुकानांसाठी भाडेतत्वावर देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत वर्दळीच्या ठिकाणीच फटाक्यांची दुकाने थाटली तर कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीव्ही सेंटर मैदानालगत मनपाचे उद्यान असून लहान मुले तसेच पालकांची याठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे या मैदाना लगत कोणतेही फटाक्यांची दुकाने नसावी अशी मागणी मनसे ने केली असून दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे स्टाईल ने मनपा प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदन प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंदू नवपुते, गणेश साळुंखे, विक्की जाधव, अविनाश फोफळे, शिवा ठाकरे, अजय कागडा, रवी गायकवाड, अमित जैस्वाल यांची उपस्थितीती होती.